पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
कोंढव्यातील समाजिक कार्यकर्ते समीर शफी पठाण यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असल्याने चर्चेला उधाण आले आहे. समीर पठाण यांचे कोंढव्यात चांगले समाजिक, शैक्षणिक व वाहतूक सोडविणे बाबतीत चांगले काम केले आहे. तसेच समीर पठाण यांच्या सोबत त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
त्या सोबत राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे माजी अध्यक्ष अजीम गुडाकूवाला यांनी देखील प्रवेश केला आहे. समीर पठाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येत्या पालिकेची निवडणूक रंगतदार होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अलीभाई दारूवाला यांच्या समक्ष प्रवेश करण्यात आला आहे.




