वानवडी मधला पठाण भाई जोरात तर हडपसर मधला शिंदे भाऊ लोकांना घालतोय कोमात?
अवैध धंदे सुरू असलेल्या ठाणे प्रमुखांची चौकशी पोलिस आयुक्त रितेश कुमार करणार का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरातील हडपसर व वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असताना देखील वरिष्ठ मात्र आळीमिळी गुपचिळी सारखे निवांत बसलेले आहेत. या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी बोकाळली आहे. हडपसर व वानवडी पोलिसांच्या नाकाखाली अवैध धंदे बोकाळली असताना देखील पोलिस ठाण्याचे प्रमुख कारवाई करत नसल्याने वानवडी पोलिस ठाण्यातील वसुली बहाद्दार “पठाण” भाई आणि हडपसर पोलिस ठाण्यातील शिंदे सरकार भाऊची चलती सध्या खुपच जोरात आहे.
समाजिक सुरक्षा विभागाने दोन दिवस रेड घातल्याने अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणदणाले असले तरी “पठाण भाई” व “शिंदे सरकार” वर वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याने दोंघाची ट्रेन सुसाट निघाली आहे. समाजिक सुरक्षा विभागाने छापा घालून २७ जणांवर कारवाई केली आहे. तर रोख २७ हजार ९ ३० रूपये व १ लाख २१ हजार रूपये, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण १ लाख ४८ हजार ९३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१० जुलै २०२३ रोजी गोसावी वस्ती , हडपसर व सातवनगर , वानवडी पुणे परीसरात काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार चालू असलेबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आले आहे.सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व दोन पाहिजे आरोपी अशा २७ इसमांविरूध्द हडपसर व वानवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ ( अ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर व वानवडी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील,सपोनि अनिकेत पोटे , पोलीस अंमलदार बाबा कर्पे,अजय राणे , तुषार भिवरकर ,इरफान पठाण , हणमंत कांबळे , इम्रान नदाफ , संदीप कोळगे , अमित जमदाडे , किशोर भुजबळ या पथकाने यशस्वी केली आहे. क्रमक्ष: पुढील बातमी – वानवडी पोलिस ठाण्यातील पठाण भाई की पाठशाला तर शिंदे भाऊ ने कहर कर डाला?