पुणे : कोंढवा NIBM रोडवरील बेकायदेशीर बांधकामांवर पालिकेची धडक कारवाई

0
Spread the love

कित्येक वर्षांपासून पत्र्यांचे शेड उभारून भाड्याने देऊन मलाई लाटली जात असल्याचा आरोप

पुणे सिटी टाइम्स प्रतिनिधी

कोंढवा एनआयबीएम रोडवर बेकायदेशीरपणे पत्र्यांचे शेड उभारून भाड्याने देऊन महिन्याला लाखो रुपयांचा मलाई लाटला जात असल्याच्या अनेक तक्रारी पुणे महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. वारंवार तक्रारी येत असल्याने नगरसेवकही वैतागले होते. एका नगरसेवकाने पालिकेकडे तक्रार करून संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत पालिकेने आज सकाळी प्रथमच एवढी मोठी कारवाई केली.

कित्येक वर्षांपासून पत्र्यांचे शेड उभारले असतानाही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या साटेलोटेमुळे कारवाई होत नव्हती. माजी नगरसेवकाचा यात मोठा रोल असल्याने कारवाईत अडथळा निर्माण होत होता. मात्र आजी नगरसेवकांच्या दबावामुळे आज काही का होईना कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यापुढे पुन्हा बांधकाम होणार नाही यासाठी पालिका दक्षता घेणार का?

कित्येक वर्षांपासून पत्र्यांचे शेड उभारून पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला गेला असला, तरी आज कारवाई झाल्यानंतरही पुन्हा त्या ठिकाणी पत्र्यांचे शेड उभारले जाणार नाहीत यासाठी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे आहे. अन्यथा पालिकेच्या अधिकाऱ्यांचेच हात काळे झाले तर मग नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची?

पालिकेची कारवाई, पण लोखंडी साहित्य जप्त का नाही?

पालिकेने एखाद्या ठिकाणी कारवाई केल्यास त्या ठिकाणचे लोखंड, सांगडे, पत्रे व इतर साहित्य जप्त करणे बंधनकारक असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते जप्त का केले नाही? यात कोणाचा दबाव होता का? किंवा हितसंबंध? याचा उलगडा लवकरच होईल. कारवाईची रक्कम जमा करण्यासाठी नोटीसा किती तत्परतेने काढल्या जातील, यावर पुणे सिटी टाइम्सचे लक्ष राहणार आहे. क्रमशः ( कौसरबाग, कापरे मळा, वेलकम चौकात पत्र्यांच्या शेडवर कारवाई कधी? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here