पुणे सिटी टाईम्स ( PCT) अजहर खान
काही दिवसांपूर्वी पुण्यातील माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस रशिद सुंडके यांनी इम्तियाज जलील यांच्या समक्ष एम.आय.एम मध्ये प्रवेश केला होता. त्या प्रवेशाने पुणे शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.
मग सुंडके यांना पुणे लोकसभेची उमेदवारी मिळणार का? यावर अनेक जाणकारांनी आप आपले मत व्यक्त केली होती. आज AIMIM कडून उमेदवारी घोषित झाल्याची माहिती अनिस सुंडके यांनी पुणे सिटी टाईम्सला दिली आहे.
पुण्यातील लोकसभा निवडणुकीत AIMIM ची उडी, माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस रशिद सुंडके यांना AIMIM कडून उमेदवारी जाहीर.!
आता पुण्यातील निवडणुकी जोरदार होणार आहे. भाजपाने मुरलीधर मोहोळ, कॉग्रेसने रवींद्र धंगेकर, तर वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यात आता एम.आय.एम ने उडी मारल्याने चांगलीच लढत होणार यात शंकाच नाही.




