पुण्यात कॉग्रेसचे अभय छाजेड व एम.आय.एम चे लोकसभा उमेदवार अनिस सुंडके यांच्यात जुंपली.

0
Spread the love

 

जिनके घर शिशो के होते है वो दुसरो के घरो पर पत्थर नही फेकते. अनिस सुंडके

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

जसं जसं निवडणुक जवळ येऊ लागली आहे तसं तसं आरोप प्रत्यारोपांची तोफ उडू लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच एम.आय.एम पक्षाने माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर करताच ” बी” टीम म्हणत आरोप करण्यात आले. त्याबद्दल अनिस सुंडके यांनी देखील तोंडसुख घेत अभय छाजेड यांना धारेवर धरले, काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांनी सांगितले की एमआयएम पक्ष हे नेहमी भाजपच्या मदतीला उभा राहतो भाजपची बी टीम एमआयएम आहे.

पुण्यात एमआयएम पक्षाने उमेदवारी देणे भाजपाच्या पडद्यामागील षडयंत्र आहे. असं खोटं आरोप त्यांनी काल एका न्यूजला दिलेल्या मुलाखत मध्ये सांगितले. व तसेच त्यांनी अनिस सुंडके यांच्यावर सुद्धा आरोप करीत सांगितले की अनिस सुंडके हे नेहमी सोयीनुसार पक्ष बदलण्याचा काम करीत असतो.

त्यासंदर्भात अनिस सुंडके म्हणाले असे खोटे आरोप करताना त्यांनी विचार केलं पाहिजे होती की, जिनके घर शिशो के होते व दुसरो के घर पर पत्थर नही फेकते. अभय छाजेड यांना मी आठवण करून देतो की ज्यावेळी कलमाडींचे नेतृत्व खाली विकास आघाडीची स्थापना झाली याच पुण्यातून तुम्ही काँग्रेस पक्षाचे विरोधात बंडखोरी केली व महाविकास आघाडी भाजपबरोबर तुम्ही गेला होता.

हा ही इतिहास विसरता कामा नये की ज्यावेळी शिवसेनेचे उमेदवार दीपक पायगुडे पूर्वीच्या असलेल्या भवानी पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते त्यावेळी उघड उघड तुम्ही व तुमच्या सहकाऱ्यांनी व पुण्यातील अनेक काँग्रेस पक्षाचे सध्या आपल्याला निष्ठावंत बोलणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी तुमच्यासोबत दीपक पायगुडे यांना काँग्रेस पक्षाचे विरोधात जाऊ मतदान देण्यासाठी लोकांना आव्हान केले होते.

मला व माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुददीन ओवेसी व एमआयएम पक्षाला बदनाम करण्यासाठी जे लोक बोलत आहे की एम.आय.एम पक्ष भाजपची बी टीम आहे.आपल्या माहितीसाठी आम्ही सांगतो की नुकताच काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये सामील झालेत.

काँग्रेस पक्षात राहून भाजपला आतून मदत करणारे तुमच्याच पक्षाचे कोण ते कार्यकर्ते आपणच विचार करावा व भाजपाची खरी बी टीम कोण आहे? याचा प्रथम विचार करा व नंतर दुसऱ्यावर आरोप करावे. असे प्रतिउत्तर सुंडके यांनी दिल्याने अभय छाजेड यावर आता काय बोलतील याकडे लक्ष टिकून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here