कोंढव्यामध्ये आमचे ठरले.. कार्यकर्त्यांनो, आता प्रचाराला लागा!

0
Spread the love

कोंढवा प्रभाग क्रमांक १९ मधील विजय आमचाच : काशिफ सय्यद

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

काही दिवसांपासून पक्षात चालू असलेल्या घमासानाला आता पूर्णविराम मिळाला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवार काशिफ सय्यद यांनी कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे, असे सांगितले आहे. प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आता पंजा आणि घड्याळ यांची लढत जोरदार होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

कोंढवा-कौसरबाग प्रभाग क्रमांक १९ मधून काशिफ सय्यद, मोहसिन शेख यांची आई तस्लीम हसन शेख आणि मेघना राजेंद्र बाबर या तिघांना काँग्रेसकडून निवडणूक लढवायचे ठरले आहे. हे ठरल्याने लवकरच पक्षाकडून या तिघांना उमेदवारी अर्ज दिले जाणार आहेत.

सोमवारी दुपारी किंवा मंगळवारी सकाळी हे तिघेही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.कोंढवा भागातील ही लढत पाहण्यासारखी ठरणार आहे. तर पॅनलमधील चौथा उमेदवार कोण असणार, याबाबत मात्र गुप्तता बाळगली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here