कोंढवा मारहाण प्रकरण चिघळले: बातमी लावल्याच्या रागातून नगरसेवक गफूर पठाण यांची पत्रकारांना शिवीगाळ; पीडित महिलेवर रुग्णालयात दबाव टाकल्याचा आरोप

0
Spread the love

तुतारीच्या नगरसेवकाने पत्रकारांना अश्लील शिवीगाळ करून तोंडाची केली मुतारी..

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी 

पुणे (कोंढवा) : कोंढवा परिसरातील मीठानगर चेतना गार्डनच्या आतमध्ये स्वच्छता कर्मचारी (झाडकाम करणाऱ्या) महिलेला झालेल्या बेदम मारहाणीच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध केल्याच्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे स्थानिक नगरसेवक गफूर पठाण यांनी थेट पत्रकारांनाच फोनवरून आई-बहिणींवरून अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या या शाब्दिक हल्ल्यामुळे पुण्यातील पत्रकार संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

नेमके प्रकरण काय?

कोंढव्यात एका स्वच्छता कर्मचारी महिलेला नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि पीडित महिलेची बाजू मांडण्यासाठी माध्यमांनी या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, या बातमीमुळे संतापलेल्या नगरसेवक गफूर पठाण यांनी संबंधित पत्रकारांना संपर्क साधून अत्यंत खालच्या पातळीवर जात अश्लील शिवीगाळ केली.

रुग्णालयात पीडितेवर दबाव टाकल्याचा आरोप?

दरम्यान, या मारहाण प्रकरणात जखमी झालेल्या पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन संबंधित महिलेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे.

पत्रकार संघटना आक्रमक

गफलत पठाण हे एक जबाबदार लोकप्रतिनिधी असूनही अशा प्रकारे अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नगरसेवक गफूर पठाण यांच्या विरोधात आता पत्रकार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवकावर आणि महिलेला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here