पुण्यातील खळबळजनक फसवणूक! कोंढव्यातील अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सचा संचालक हज यात्रेकरूंचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार

0
Spread the love

पुणे शहरातील उडाली खळबळ, नागरिकांनी व्यक्त केला संताप

हजसाठी पुर्ण ५ लाखांची रक्कम भरूनही पुन्हा प्रत्येकी ३ लाखांची मागणी

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.

पुणे – कोंढवा परिसरात हज-उमराह यात्रेसाठी फसवणूक करणाऱ्या अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सच्या संचालकाने तब्बल ९ कोटींहून अधिक रक्कम घेऊन फरार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यात्रेकरूंमध्ये संतापाचे वातावरण आहे.
अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सचा संचालक अमीर सरदार शेख याने हज यात्रेसाठी पुणे आणि आसपासच्या भागातील १४६ यात्रेकरूंकडून प्रत्येकी ५ लाख रुपये घेतले होते. त्याशिवाय उमराह यात्रेसाठीही अनेकांकडून ७५ हजार रुपये प्रत्येकी घेतल्याने एकूण रक्कम ९ ते १० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.

यात्रेकरूंनी सांगितले की, हजसाठी सुरुवातीला ५ लाख रुपये भरल्यानंतर पुन्हा प्रत्येकी ३ लाखांची अतिरिक्त मागणी करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी अमीर शेख फरार झाल्याने यात्रेकरू हैराण झाले आहेत. त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता घराला कुलूप लावलेले आढळले.

लाइसन्सशिवाय व्यवसाय?

अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सकडे स्वतःचे कोणतेही वैध लायसन्स नसल्याचे समोर आले आहे. अमीर शेख मुंबईतील एका टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या लायसन्सचा गैरवापर करत होता. मात्र, त्या कंपनीपर्यंत पैसे न पोहोचल्याने प्रकरण उघडकीस आले.

पार्टनर्सवर कारवाई का नाही?

अमीर शेखसोबत असलेल्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि पार्टनर्सनी नफ्यात भागीदारी घेतली होती. आता अमीर फरार झाल्यावर ते सर्व “आम्ही फक्त कामाला होतो” असे म्हणत आहेत. पोलिसांनी अद्याप त्यांची गंभीर चौकशी केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागरिकांनी पुणे पोलिस आयुक्तालय तसेच कोंढवा आणि खडक पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवावी, जेणेकरून अमीर शेख आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई होईल, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.

कोंढव्यातील अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सचा कार्यालय रातोरात रिकामा 

कोंढवा कौसरबाग मधील अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालय रातोरात रिकामा करण्यात आले आहे. मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या साथीदारांनी सगळे झोपल्यावर कार्यालय रिकामे केले. आम्ही कामावर आहोत म्हणणारे मग आता कार्यालय रिकामे करताना अग्रेसर का? याची देखील पोलिसांनी चौकशी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here