बिबवेवाडी हादरली! गंगाधाम येथे ‘स्टार कन्स्ट्रक्शन’कडून जिलेटिनद्वारे टेकडीफोड; साहित्य जप्त होऊन दोनदा गुन्हे दाखल, तरीही पुन्हा उत्खननाला परवानगी दिल्याने अधिकारी वादाच्या भोवऱ्यात

0
Spread the love

पुणे सिटी टाइम्स ग्राउंड रिपोर्ट..

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.

पुणे : मौजे बिबवेवाडी सिटी सर्व्हे नंबर ५७९/१अ आणि ५७९/१ ब, ५८० ,३५६/१, ३५६/२ या जागेत बांधकाम व्यावसायिकाने जिलेटिनच्या स्फोटांनी पुन्हा एकदा टेकडी हादरवून सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील ‘स्टार कन्स्ट्रक्शन’वर बेकायदेशीरपणे स्फोटके वापरून टेकडीफोड केल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.

मागील बातमी }} पुण्यातील गंगाधाम चौकातील स्टार कन्स्ट्रक्शनकडून रात्री २ वाजता नियम धाब्यावर बसवून गौण खनिज उत्खनन; तहसील कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह?

धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी याच प्रकरणात उत्खननाचे साहित्य जप्त करण्यात आले होते आणि दोन वेळा मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते; तरीही त्याच वादग्रस्त जागेवर प्रशासनाने पुन्हा उत्खननाची परवानगी कशी दिली? असा संतप्त सवाल विचारला जात असून महसूल व पालिका वर्तुळातील संबंधित अधिकारी आता थेट संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

दोनदा गुन्हे, तरीही पुन्हा तीच मनमानी!

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधाम परिसरातील संबंधित जागेवर गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी रहिवासी वस्ती असलेल्या परिसरात टेकडी फोड झाल्याने अमीत ललवाणी यांच्यासह इतरांवर टेकडी फोड केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात १४ जाने २०२६ व ऑगस्टच्या महिन्यात असे मिळून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.

मागील बातमी }}  पुणे सिटी टाईम्स इम्पॅक्ट : गंगाधाम चौकात टेकडी फोड: तहसीलदारांचे उत्खनन थांबवण्याचे आदेश, तरीही संशय कायम वाचा सविस्तर

जिलेटिनच्या कांड्या वापरून जोरदार स्फोट घडवून आणण्यात येत असल्याने परिसरातील घरांना तडे जाण्याची भीती निर्माण होऊन नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे.

मात्र, इतकी गंभीर पार्श्वभूमी असतानाही शासकीय यंत्रणेने पुन्हा या जागेवर गौण खनिज उत्खननाची नवी परवानगी बहाल केल्याने सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मागील बातमी }}} पुणे सिटी टाईम्स इम्पॅक्ट : गंगाधाम चौकातील स्टार कन्स्ट्रक्शन हिलव्ह्यू परसेप्शन रिॲलिटीविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

नागरिकांचा रोष आणि अधिकाऱ्यांवर संशयाची सुई

स्फोटके कायदा आणि पर्यावरण विभागाच्या नियमांनुसार, नागरी वस्तीजवळ अशा प्रकारे स्फोटके वापरून टेकडीफोड करण्यास सक्त मनाई आहे. शिवाय ज्या जागेवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले प्रलंबित आहेत, तिथे नव्याने मंजुरी देताना कोणतीही ठोस शहानिशा करण्यात आली नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

> “गुन्हे दाखल होऊनही जर वारंवार नियम पायदळी तुडवले जात असतील आणि अधिकारी डोळेझाक करून नव्या परवानग्या देत असतील, तर यामागे नेमके कोणाचे आर्थिक किंवा राजकीय हितसंबंध आहेत?” — स्थानिक नागरिक

प्रशासनाची भूमिका काय?

या संदर्भात आता पर्यावरणप्रेमी संघटना आणि स्थानिक रहिवासी आक्रमक झाले असून, सदर वादग्रस्त परवानगी तात्काळ रद्द करावी, संबंधितांवर कडक फौजदारी कारवाई करावी आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी जोरदार मागणी लावून धरली जात आहे. जर प्रशासनाने ही टेकडीफोड तातडीने थांबवली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

महानगरपालिका व विकास आराखडा (DCR) नियम झोनिंग तपासणी

संबंधित जागा महापालिकेच्या विकास आराखड्यात (Development Plan) कोणत्या झोनमध्ये येते (उदा. Hill Top – Hill Slope, No Development Zone की Residential Zone) याची तपासणी केली जाते. हिल-टॉप किंवा हिल-स्लोप झोनमध्ये टेकडीफोडीला कडक निर्बंध असतात.

सुरक्षित अंतर (Buffer Zone): रहिवासी वस्ती, शाळा, रुग्णालये किंवा सार्वजनिक रस्त्यांच्या १०० ते २०० मीटरच्या (स्थानिक नियमांनुसार) परिसरात तीव्र स्फोटांना पूर्ण बंदी असते. अशा ठिकाणी केवळ ‘कंट्रोल्ड ब्लास्टिंग’ (Controlled Blasting) किंवा नॉन-एक्सप्लोझिव्ह केमिकल तंत्रज्ञान वापरण्याचीच मुभा असते.

. प्रत्यक्ष जागेवरील सुरक्षा मानके
स्फोटापूर्वी परिसरात सायरन वाजवून धोक्याची सूचना देणे.

उडणारे दगड अडवण्यासाठी सुरक्षित लोखंडी जाळ्या किंवा ब्लास्टिंग मॅट्स (Wire Mesh/Blasting Mats) वापरणे.

परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवणे आणि प्रवेशद्वारांवर धोक्याचे फलक लावणे. क्रमशः 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here