पुण्यातील पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, एसीपी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पीएसआय विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलीस दलात खळबळ.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.

पोलिस उपायुक्त दर्जाच्या व सहायक पोलीस आयुक्त,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पीएसआय विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. आजकाल रक्षकच भक्षक झाले आहेत. हकीकत अशी की,भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणात मुख्य संशयित असलेल्या सुनिल झंवर यांनी गृहखात्याकडे तक्रार अर्ज केला होता.

त्यावरुन या प्रकरणातील पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह खात्याच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. त्यात जळगावमधील छाप्यामध्ये असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.पीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या मुख्य संशयिताने शासनाकडे केलेल्या तक्रारीमध्ये पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक इतर चौघांचा समावेश आहे.

बीएचआर गैरव्यवहारात संगनमत करुन मालमत्ता घेणे, कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी सुनिल झंवर यांना अटक करण्यात आली होती. त्यांना ने फेब्रुवारी २०२२ मध्ये जामीन मंजूर होता. बीएचआर प्रकरणात शिक्रापूर आणि पुण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती. त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर प्रकरणात शिक्रापूर आणि पुण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते.

त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी भाग्यश्री नवटके या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगावात एकाच वेळी १० पेक्षा अधिक ठिकाणी छापे घालण्यात आले होते. या छाप्याच्या वेळी अनेक गैरबाबी करण्यात आल्याचे सुनिल झंवर व इतरांनी समोर आणले होते. त्यात छाप्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे बील दुसऱ्याच व्यक्तीने दिले.

छाप्यासाठी जाताना वापरलेल्या खासगी गाड्याही दुसऱ्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. आपल्याला यात राजकीय कारणावरुन अडकविण्यात आल्याचा आरोप सुनिल झंवर यांनी केला होता.याबाबत तक्रारदार सुनिल झंवर यांनी सांगितले की, आपल्याविरुद्ध खोटे एफआयआर दाखल केले.माझ्या मुलाचा काहीही संबंध नसताना त्याला सहा महिने कोठडीत डांबून ठेवले.

एका रात्रीत तीन एफआयआर दाखल केले.खोट्या तक्रारदारांच्या नावाने तक्रारी दाखल केल्या. सरकारी नस्तीची पाने बदलली.झंवर यांना अटक करण्यासाठी रात्री १३५ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणले गेले.अशा अनेक बाबी आपण उघड केल्या असून त्याची तक्रार गृह खात्याकडे पुराव्यानिशी केली होती.त्यात आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व इतर पोलीस अधिकाऱ्यांची नावे सुनिल झंवर यांनी दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here