पुण्यात पुन्हा ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह! भीषण अपघात,मद्यधुंद चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. पबला ठोकले टाळे?

0
Spread the love

तरूणाचा जागीच मृत्यू. 

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी, 

पुणे शहरात मध्यंतरी काळात पोरशे कार प्रकरण चांगलेच गांजले,तर पबला देखील टाळे ठोकण्यात आले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा कल्याणीनगर मध्ये घडली आहे.पोलिसांकडून माहितीनुसार, कल्याणीनगर भागात ‘टोईट’ नावाचं रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटच्या बाहेर अपघात घडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. प्रताप असं या आरोपी चालकाचं नाव आहे, तर सत्येंद्र मंडल असं मृत तरुणाचं नाव आहे. तो पार्किंग असिस्टंट म्हणून काम करत होता, अशी माहिती आहे.

अशातच आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास, एका भरधाव वाहनाने या रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये प्रवेश केला. तसेच काही समजायच्या आत ती गाडी थेट पार्किंग काउंटरवर जाऊन धडकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here