रात्रीचं अवैध गौण खनिज उत्खनन आणि तब्बल ४ महिन्यांनंतर मंडल अधिकाऱ्यांची तपासणी. शंकरशेठ रोड येथेल प्रकार.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

तहसीलदारांची गौण खनिज उत्खननाला परवानगी असो किंवा नसो सूर्य मावळल्यानंतर गौण खनिज उत्खनन हे अवैधच धरले जाते.सूर्य मावळल्यानंतर गौण खनिज उत्खनन होत असल्याची नागरिकांनी तहसीलदार व मंडल अधिकारी आणि तलाठी यांना तक्रार केल्यावर लगेचच कारवाई करणे व उत्खनन थांबवून जेसीबी जप्त करणे हे महसूल कायदयानुसार बंधनकारकच आहे. परंतु आज सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे सूर्य मावळल्यानंतरही गौण खनिज उत्खनन चालू आहे.परंतु मंडल अधिकारीच मस्तवाल असेल तर? मग काय शासनाचा महसूल बुडणारच यात काही शंकाच नाही?

सर्वे नं ७१०/ब/ २,फा. प्लॉट नंबर ३८२+३८३/२ भवानी पेठ ( शंकरशेठ रोड कुमार कुमार पेस्पिक मॉल समोर) वन अपेकस रियालिटीचे बांधकाम चालू आहे. सदरील ठिकाणी बांधकाम करणाऱ्याने ३ नोव्हेंबर २०२३ रोजी अर्ज करून परवानगी घेतली होती. त्यानंतर त्याची परवानगी मुदत ५ फेब्रुवारी २०२४ रोजी संपली. त्यानंतर अजहर खान यांनी ३ एप्रिल २०२४ रोजी विनापरवाना आणि सूर्य मावळल्यानंतरही गौण खनिज उत्खनन चालू असल्याची लेखी तक्रार तहसीलदारांना केली होती.

तहसीलदारांनी सदरील ठिकाणी पाहणी करून अहवाल सादर करायला लावला होता. परंतु वरिष्ठांचे आदेश पाळतील तर ते कर्मचारी कसले? मधील काळात म्हणजे ३ एप्रिल २०२४ ते ४ जुलै २०२४ म्हणजे तब्बल ३ महिन्यानंतर पुन्हा गौण खनिज उत्खननासाठी परवानगी मागण्यात आली. मग मधील काळात जे गौण खनिज उत्खनन झाले त्याचे काय? मधील काळातच तपासणी पंचनामा झाला असता तर, आज तहसील कार्यालयाची  अब्रू वेशीला टांगली गेली नसती?

३ एप्रिल २०२४ रोजी केलेली तक्रारीचा पंचनामा मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांनी तब्बल ८ महिन्यानंतर पंचनामा करून अर्धवटरावा सारखा पंचनामा करून पाठवला.

तर या संदर्भात वरिष्ठांनी देखील त्या मंडल अधिकाऱ्यांना खुलासा विचारला नाही. अजहर खान यांनी माहिती अधिकारात सदरील माहिती मागितल्याने तब्बल ८ महिन्यानंतर माहिती अधिकाराचे उत्तर देण्यत आल्याने सदरील बाब उघडकीस आली आहे.
पुष्पा गोसावी यांनी सदरील ठिकाणी वेळेवर पंचनामा केला असता तर आज शासनाच्या तिजोरीत भर पडली असती,

परंतु ते त्यांना का नको होते? त्यांचे हात ओले त झाले नव्हते ना? किंवा आर्थिक साटेलोटे? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहे. तर पुष्पा गोसावी यांची विभागी चौकशी करण्यात यावी यासाठी अजहर खान हे लवकरच महसूल मंत्री यांना साकडे घालणार आहे. क्रमशः ( पुढील बातमीत गौण खनिज उत्खनन करणारे नातेवाईक? )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here