तब्बल ८ लाखांची गारमेंटची केली चोरी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका दुकानातून तब्बल ८ लाखांची लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट चोराला येरवडा पोलिसांनी शिफातीने पकडले आहे. १९ एप्रिल २०२५ रोजी तपास पथकाचे पोलिस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलिस हवालदार सागर जगदाळे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी प्राप्त झाली की कल्याणीनगर येथील एस.एल एन्टरप्रायजेस नावाचे जॉकी कंपनीचे कपडयाचे शॉपमध्ये चोरी करणारा इसम गणपत डांगी हा कल्याणीनगर येथे थांबलेला आहे.
त्याप्रमाणे सदर ठिकाणी एक इसम थांबलेला दिसलेने तपास पथकाचे अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे, तुषार खराडे, सागर जगदाळे, भीमराव कांबळे, प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल यांनी त्यास पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले.
त्याचा नाव पत्ता विचारता त्याने गणपत मांगीलाल डांगी वय ४४ वर्षे रा विठ्ठल नगर सिंहगड रोड पुणे असे सांगितले. सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन गुर नं २८०/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) मध्ये कपडयाचे शॉपमधून ८ लाख रुपये किंमतीचे लेडीज व जेन्टस अंडरगार्मेंट चोरी केलेबाबत गुन्हा दाखल आहे.
त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने जून २०२४ पासून वेळोवेळी शॉपमधून लेडीज जेन्टस अंडरगारमेंट चोरी केल्याचे कबूल केले आहे.
तर आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी ७ लाख ३०हजार रुपये किंमतीचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलीस सह-आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, हिम्मत जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पल्लवी मेहेर, पोलिस निरीक्षक गुन्हे, विजय ठाकर, यांचे मार्गदर्शनाखाली
तपास पथकाचे अधिकारी सुनिल सोळुंके, प्रदिप सुर्वे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे,अनिल शिंदे, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, संदिप जायभाय, सुधीर सांगडे यांनी केलेली आहे.