कोंढवा खुर्द : काय म्हणता बापरे..! नवाजिश चौकाजवळ नगरसेवकाच्या ऑफिसच्या पाठीमागे मुस्तफा आणि चॉंद या बिल्डरने उभारला ८ मजली ‘टोलेजंग ताजमहाल’!

0
Spread the love

केवळ २ गुंठ्यांवर आणि ८ फुटाच्या अरुंद रस्त्यात बेकायदेशीरपणे उभी केली ८ मजली इमारत.

वीज मीटर, बोगस कागदपत्रे आणि नागरिकांची फसवणूक असा एकछत्री प्रकार!

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

पुणे : कोंढवा खुर्द येथील नवाजिश चौकाजवळ नगरसेवकाच्या कार्यालयाच्या पाठीमागे मुस्तफा आणि चॉंद या बिल्डरने ८ मजली बेकायदेशीर इमारत उभी केल्याचे समोर आले आहे. केवळ ८ फुटाच्या अरुंद रस्त्यात आणि २ गुंठे जागेवर ही ‘टोलेजंग’ इमारत बांधण्यात आली आहे.

ही इमारत बेकायदेशीरपणे उभी राहत असताना पुणे महानगरपालिकेच्या नाकाखाली घडलेला हा प्रकार पुन्हा एकदा पालिकेच्या कारवाई यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे करतो आहे. बेकायदेशीर बांधकाम, बोगस कागदपत्रे, वीज मीटर दाखला आणि नागरिकांची फसवणूक असे अनेक गंभीर आरोप या प्रकरणात आहेत.

 

धक्कादायक बाब म्हणजे, गौण खनिज उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवल्याचा देखील आरोप आहे. बांधकामादरम्यान बिल्डरने मोठा खड्डा खोदून गौण खनिज काढले आणि त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा अंदाजे ७ ते ८ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून स्थानिकांनी चौकशीची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “नगरसेवकाच्या ऑफिसच्या इतक्या जवळ अशी बेकायदेशीर इमारत उभी राहत असताना पालिका प्रशासन काय करत होते?”पुणे महानगरपालिकेने यापूर्वी काही ठिकाणी बुलडोझर कारवाई केली असली तरी, कोंढवा परिसरात बेकायदेशीर बांधकामे रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बेकायदेशीर बांधकामावर लवकरच बुलडोझर कारवाई करण्यात येईल. क्रमशः 

कामगार कायद्याची पायमल्ली…

बेकायदेशीर बांधकामात केवळ बांधकाम नियमानांचे उल्लंघन झाले नाही, तर कामगार कायद्यालाही केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. कामगारांना योग्य सुरक्षा उपकरणे (हेल्मेट, हार्नेस, सेफ्टी शूज) न देता, उंच इमारतीवर जोखमीचे काम करायला लावणे, कामाचे वेळापत्रक आणि विश्रांतीचे नियम पायदळी तुडवणे असे अनेक गंभीर प्रकार येथे घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here