पुणे : हडपसर सय्यदनगर मध्ये एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी व्यक्त केला संताप;  डॉक्टर पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

पुण्यातील हडपसर सय्यदनगर नगरमध्ये ६ एप्रिल २०२६ रोजी माजी नगरसेवक फारूख इनामदार यांच्या घरासमोर एका कार चालकाने दारू पिऊन भरधाव वेगात कार दाटून अनेक वाहनांना जोरदार धडक दिली होती. त्यात एका युवकाला गंभीर इजा झाल्याने त्याला जवळच असलेल्या नवजीवन नर्सिंग होम दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

परंतु त्याच्याकडे सदरील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी व्यवस्थित उपाचार न केल्याने मोहम्मद नफीस (वय ३२ वर्षे रा. सय्यदनगर गल्ली २३अ)  हा युवक आज दगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर याची खबर वाऱ्यासारखी पसरली अन् डॉक्टरांनी हात झटकलयाचे देखील स्थानिक नागरिकांनी सांगितले.

युवक दगावल्याने त्याच्या घरच्यांना संताप व्यक्त केला. तर जो पर्यंत  गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. तर डॉक्टरांचा  दवाखाना बंद केला जात नाही

तोपर्यंत आम्ही निवांत बसणार नाही असं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर रूमाना आणि इकबाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिथे चाललेल्या गोंधळामुळे संपर्क होऊ शकला नाही.

“डॉक्टर पती-पत्नी विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी”

नवजीवन नर्सिंग होम दवाखान्यात यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच सदरील प्रकार वारंवार त्या दवाखान्यात घडत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. या बाबतीत पुणे सिटी टाईम्स पुणे महानगर पालिका आयुक्तांना भेटून दवाखान्या संदर्भात तक्रार दाखल करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here