हडपसर सय्यदनगर मध्ये चौकशी टिपू पठाणची, तोडफोड मात्र त्याच्या भावाच्या ऑफिसची. पोलिसांच्या गुंडगिरीवर महिला संतप्त.

0
Spread the love

 

पुणे गुन्हे शाखा युनिट ५ मधील पोलिसांवर कारवाईची मागणी.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

पुणे शहरातील हडपसर सय्यदनगर मध्ये टिपू पठाण यांच्या भावाच्या ऑफिसवर गुन्हे शाखा युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी विचारपूस करण्यासाठी गेले होते. विचारपूस करून निघायचं सोडून टिपू पठाण यांचा भाऊ व भाऊजाय चे सिक्युरिटी गार्ड चे असलेले ऑफिसची तोडफोड पोलिसांनी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या अश्या बेकायदेशी कृतीने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

*pune | हडपसर सय्यदनगर मधील ” टिपू पठाण ” यांचा ऑफिस समजून सिक्युरिटी गार्डच्या ऑफिसची पोलिसांनी केली तोडफोड. पोलिसांच्या गुंडगिरीवर पोलिस आयुक्त कारवाई करतील का?*

*”पुणे सिटी टाइम्स” शी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्राम ला 👍लाईक 👉फॉलो ↗️शेअर नक्की करा*

 

ऑफिस समोर नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्चीच्यांची तोडफोड करून पोलिसांनीच अस‌ मालमत्तेच नुकसान करणे कितपत योग्य आहे? पोलिसांनी केलेल्या तोडफोडी मुळे रक्षकच झाले भक्षक, असा नाराजगीचा सुर उमटत आहे.

१८ एप्रिल २०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलिस एपीआय कृष्णा बाबर व राजस शेख आणि अतुल पवार व इतर कर्मचारी टिपू पठाण याची माहिती घेण्यासाठी सय्यदनगर मध्ये असलेल्या इफरा सिक्युरिटी गार्ड कंपनी मध्ये गेले होते. परंतु तेथे त्यांच्या हाती काहीच न‌ लागल्याने बाबर,शेख, पवार यांनी ऑफिस मधील व बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांची नासधूस केली.

व तेथील काही लोकांना जबर मारहाण केली आहे.तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तर संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी सिक्युरिटी गार्ड कंपनीच्या संचालिका यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here