कोंढवा शिवनेरी नगर मध्ये बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी घालतयं तरी कोण?

0
Spread the love

शाकीर शेख व अलताफ पठाण नावाच्या बिल्डरांकडून बेकायदेशीर बांधकाम. कारवाई नंतरही पुन्हा बांधकाम.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

कोंढवा मधील बेकायदेशीर बांधकामांना उत आला असताना देखील आज पालिकेचे कर्मचारी तोंड बघून कारवाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अधिकारी छोट्या छोट्या कारवाई करून मोठमोठ्या कारवाई केल्याचे भासवण्यात पटाईत आहेत.

अशीच कारवाई शिवनेरी नगर गल्ली २ आणि ३ मधील अलताफ पठाण व शाकीर शेख व कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये अतिक्रमण विभागात काम केलेल्या शेख यांचे देखील बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचे दिसून आले.

मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकाम करून रस्ते, ड्रेनेज, वाहतूकीस अडथळा निर्माण केले जात असतानाही पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा गप्प आहेत.

बेकायदेशीर बांधकामे करून गलेलठ्ठ होणाऱ्यांवर मोफा अंतर्गत कारवाई का होत नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here