पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढवा मध्ये बेकायदेशीर बांधकामांचा महापूर आला आहे अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे बिनधास्तपणे चालू आहे. त्या बांधकाम करणाऱ्या धनाजी बिल्डरांना काहीच देणे घेणे नाही.
बेकायदेशीर बांधकामे करून लाखो रूपयांची माया जमवून हे पुन्हा दुसऱ्या कामाकडे वळतात? परंतु बेकायदेशीर बांधकाम कधी पडले तर याला जबाबदार कोण? हा महत्त्वाचा विषय आहे.
शिवनेरी नगर गल्ली नं २ मध्ये अलताफ पठाण, गल्ली नं ३ मधील व इतर बेकायदेशीर बांधकामासंदर्भात पुणे सिटी टाईम्स ने बातमी प्रसिद्ध केली होती.
तर त्या अनुषंगाने पुणे महानगर पालिका ॲक्शन मोडवर आली आणि शिवनेरी नगर गल्ली नं २ ,आणि गल्ली नं १७ ,१८ मध्ये बेकायदेशीर बांधकामांवर पालिकेने हातोडा चालवत मोठी कारवाई केली आहे.
सदरील कारवाई ने बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणदणाले आहेत. बेकायदेशीर बांधकामे कोणी करू नये असे आव्हान पालिके तर्फे करण्यात आले आहे. तर सदरील बेकायदेशीर बांधकामांमधील फ्लॅट विक्री करण्यात येऊ नये असे पुणे सिटी टाईम्स कडून नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे.
मग गल्ली नं ३ मध्ये कारवाई कधी?
शिवनेरी गल्ली नं ३ मध्ये “शाकीर शेख ” याचे देखील बेकायदेशीर बांधकामे चालू आहे. त्यावर पुणे महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली नाही. मग त्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई कधी केली जाणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.