अजितदादांच्या पक्षाला पडणार खिंडार..! माजी नगरसेवक तुतारी फुंकणार?

0
Spread the love

 

विधानसभे पूर्वीच राजकीय समीकरणे.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

कोंढव्यात लवकरच फेरबदलाचे वारे वाहू लागणार आहेत? विधानसभा निवडणुक लवकरच घोषणा होणार असल्याने, काही आजी माजी भावी कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार शरदचंद्र पवार यांच्या सोबत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला भरून भरून प्रतिसाद मिळाला. परंतु अजित पवारांनी काकांना रामराम करून भाजपाला साथ दिल्याने काही लोकांची पायाखालची जमीनच सरकली होती.

तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहण करण्यासारखे झालं होते. तर कोंढव्यात लोकसभेला बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. परंतु आता त्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी काही आजी माजी भावी लोकांनी रणनीती आखत आता शरदचंद्र पवार यांची तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे अजितदादांच्या पक्षाला कितपत मतदान होईल हे येणारे काळच सांगेल? तर शनिवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी कोंढव्यात रोड शो केल्याने चांगलेच चर्चेला उधान आले आहे. रोड शो ने नांगर फिरवल्याने आता यात मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल याची माहिती काही जाणकारांनी दिली आहे.

हडपसर मतदारसंघातून माजी महापौर प्रशांत जगताप हे विधानसभेसाठी ईच्छुक आहे. त्यांना बराच प्रतिसाद मिळत आहे. तर हडपसर मतदारसंघातून चेतन तुपे पण विधानसभेसाठी रणनीती आखत आहे. जगताप तुपे यांच्यात चांगला संघर्ष पाहायला मिळणार आहे.

परंतु चेतन तुपे यांनी कधी तुतारी फुंकली तर? प्रशांत जगताप , चेतन तुपे यातील कोण पावर फुल असणार? याबाबत येणार काळच दोंघाचे भविष्य सांगून शकेल?

” चेतन तुपे आमदार परंतु कोंढव्यातील विकासकांबाबतीत जनता नाराज? “

चेतन तुपे हे निवडून आल्यानंतर कोंढव्यात चांगले विकास कामे होतील या बाबतीत नागरिक आशेने पाहत होते. परंतु कोंढव्यातील अतिक्रमण, रस्ते, ड्रेनेज लाईन, वाहतूक कोंडी, बरीचशी परिस्थिती जैसेथी वैसेच आहे. परंतु आता आमदारांना १०० कोटी कामाला मिळाले असूनही अद्याप कोंढव्यात कुठेही काम चालू नसल्याचे सुंत्रानी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here