पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंबडी कापून न दिल्याचा राग आल्याने एकाला फायटर ने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोसीन हमीद सैय्यद, वय-२७ धंदा कामगार, रा. इलीगड सोसायटी, नुराणी कब्रस्तान जवळ, कोंढवा, पुणे-४८ यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शिवाजी मार्केट, कॅम्प, पुणे येथील अन्वर चिकन शॉप मध्ये कोंबड्या कापण्याचे काम करतात.
पहाटे ५ वाजता ते कामावर आलो होतो. कामावर आल्यावर नेहमी प्रमाणे कोंबड्या कापण्याचे काम सुरु केले. त्यावेळी दुकानात पहाटपासुन ते सकाळच्या ९:३० वाजेपर्यत कोंबड्या कापण्याचे काम केले. त्यांनतर कोंबडया कापुन झाल्यावर त्यांचा जमा झालेला कचरा प्लॉस्टीकच्या टफ मध्ये गोळा करुन बाहेर कचराकुडी मध्ये टाकुन आले. परत येत असताना फिर्यादीला क्लासिक चिकन सेंटरचा मालक समीर हाजी म्हणला की,
तुझ्या टफ मधुन घाण गळत आहे असे म्हणुन आई बहिणीवरुन शिवीगाळ करू लागला. त्याकडे दुर्लक्ष करुन ते त्यांच्या दुकानावर गेले व परत तेथील कचरा गोळा केला व कचराकुंडी मध्ये कचरा टाकुन परत त्याच्या दुकानासमोरुन जात असताना त्याने फिर्यादीला आवाज दिला व बोलावुन घेतले.
समीर हाजी याच्या जवळ गेले असता तो समीर हाजी म्हणाला की माझ्या दुकानातील पाच कोंबड्या मेल्या आहेत. देतो का कापुन. फिर्यादीने त्याला सांगीतले की मी मेलेल्या कोंबड्या कापणार नाही. समीर हाजी याला असे म्हटले असता त्याला सदर गोष्टीचा राग आला व त्याने गचांडी पकडुन फिर्यादीच्या कानाखाली हाताने झापड मारून शिवीगाळ करु लागला. त्याने त्याच्या खिशातुन लोखंडी फायटर काढले व फिर्यादीच्या नाकावर व कपाळावर जोरात मारले. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले.
मागील बातमी }}}}} pune kondwa | अजितदादांच्या पक्षाला पडणार खिंडार..! माजी नगरसेवक तुतारी फुंकणार?
तसेच समीर हाजी याला प्रतिकार करत असताना समीर हाजीचा मुलगा, दुकानातील कामगार (नाव माहित नाही) यांनी हाताने फिर्यादीच्या तोंडावर व छातीवर मारहाण केली आहे. तसेच समीर हाजी व त्याचे साथीदार यांनी धमकी दिली की यानंतर तु मार्केट मध्ये आम्हाला दिसल्यास तुझे हात-पाय तोडुन टाकेन अशी धमकी दिली. लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर मोकाटे करीत आहेत.