वाहतूक सोडविण्याचे सोडून पावत्या फाडण्यात मग्न असलेल्या पुणे शहर वाहतूक शाखेतील ३ पोलिस कर्मचारी निलंबित; पोलिस दलात उडाली खळबळ.

0
Spread the love

नेम प्लेट झाकून करत होते कारवाई.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

वाहतूक सोडविण्याचे सोडून पावत्या फाडण्यात मग्न असलेल्या पुणे शहर वाहतूक शाखेतील ३ पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. १) पोलिस हवालदार बककल नं ३०५२ जितेंद्र दत्तात्रय भागवत, २) पोलिस हवालदार बककल नं ३०१६ जयसिंग यशवंत बोराणे,३) पोलिस हवालदार ९५६ गोरख मारुती शिंदे ,असे निलंबित केलेल्या वाहतूक पोलिसांचे नावे आहेत. हे तीनही जण डेक्कन वाहतुक विभागात कार्यरत होते.

या तिघांची नेमणू जंगली महाराज रोड येथे असताना पोलीस उप-आयुक्तांनी १२.३६ मिनिटांनी मोबाईल फोनव्दारे कळविले की, प्रभातरोड हॉटेल रॉयल्टी व त्यापुढे वाहतूक कोंडी झाली असून रस्त्याचे दोन्ही बाजूस दुचाकी वाहने लागलेली असून तात्काळ कारवाई करून वाहतूक सुरळीत करावी असे कळविले. ठाणे अंमलदार पोलिस हवालदार पाटील यांना फोन केला असता त्यांचा फोन व्यस्त होता. त्यानंतर त्यांचा फोन लागला त्यांना कळविण्यात आले पोलीस उप-आयुक्तांनी कळविले आहे की, प्रभातरोड, हॉटेल रॉयल्टी व

त्यापुढे वाहतूक कोंडी झाली असून रस्त्याचे दोन्ही बाजूस दुचाकी वाहने लागलेली असून तात्काळ कारवाई करून वाहतूक सुरळीत करावी असे कळविले असता ठाणे अंमलदार यांनी सदरचा मेसेज तात्काळ विशेष कारवाई करणारे अंमलदार यांना फोनव्दारे माहिती देवून सदर ठिकाणी रवाना केले तसेच टेम्पो ऑपरेटर क्रेन ऑपरेटर यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहिती टाकून फोनव्दारे माहिती दिली.

भांडारकर चौकात ३ पोलीस अंमलदार एकत्र येवून कारवाई करीत असताना मिळून आले. त्यानंतर स्वतः सदरचाबतची माहिती फोनव्दारे प्रभारी अधिकारी, डेक्कन वाहतूक विभाग, यांना देण्यात आली की प्रभात रोड, रॉयल्टी हॉटेल, रोहिणी भाटे चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असताना आपले विभागातील ३ पोलीस अंमलदार भागवत, चोराणे, शिंदे हे वाहतूकीचे नियमन न करता सदर ठिकाणी कारवाई करीत असताना मिळून आलेले आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे प्रथम कर्तव्य आहे की वाहतूक नियमन करणे, वाहतूक कोडी होवू न देणे असे लेखी आदेश असतानाही ते एकत्र येवून एकाच ठिकाणी कारवाई करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

तसेच पोलिस हवालदार शिंदे हे तेथे वरिष्ठांची गाडी पाहून सदर ठिकाणाहून पड काढला.तर अंमलदार यांनी कर्तव्य करीत असताना नेमप्लेट झाकून न ठेवणे असे लेखी आदेश असतानाही भागवत व चोराणे यांनी स्वतःचे मोबाईल हे त्यांच्या युनिफॉमवरील खिशामध्ये अशा पध्दतीने ठेवले होते की त्यांची नावाची प्लेट ही पूर्णपणे जाणीवपूर्ण झाकलेली होती ही बाब अतिशय गंभीर व संशयास्पद असल्याने त्यांना पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here