अल्पवयीन मुलाचा खुन करणारे सराईत गुन्हेगारांना १२ तासात अटक; गुन्हे शाखा युनिट ५ ची कारवाई.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

अल्पवयीन मुलाचा खुन करणारे सराईत गुन्हेगारांना १२ तासात गुन्हे शाखा युनिट ५ ने कारवाई करून अटक केली आहे. सुमारे दिड वर्षापुर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी रावसाहेब कांबळे रा. मिरेकर वस्ती, हडपसर पुणे यास बाबु ठाकुर याने मारहाण केली होती. त्याबाबतची टिप स्वप्नील झोबार्डे याने दिल्याचा संशय सनी कांबळे यास होता. त्यामुळे सनी कांबळे व स्वप्नील विठ्ठल झोबार्डे वय १७ वर्षे रा. मिरेकर वस्ती, हडपसर पुणे याचेमध्ये वाद होत होता. त्या कारणावरुन सनी कांबळे व त्याचे साथीदार यांनी स्वप्नील झोबार्डे याचा खुनाचा कट रचुन १७ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १० वाजण्याचे सुमारास स्वप्नील झोबार्डे यास समझोता करण्याचे इरादयाने बोलावुन घेवुन सनी कांबळे व त्याचे साथीदार यांनी स्वप्नील झोबार्डे यास कोयत्याने डोक्यात वार करुन खुन केला होता.

हडपसर ठाण्यात गु.र.न. १४०६ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. गुन्हयातील मुख्य आरोपी सनी रावसाहेब कांबळे व अमन नवीद शेख हे गुलबर्गा, कर्नाटक येथे पळुन जाण्याचे तयारीत असताना युनिट -०५, गुन्हे शाखेचे पोलीस अमंलदार यांना मिळालेल्या बातमीवरुन त्यांना लोणी टोलनाका, पुणे सोलापुर रोड येथुन ताब्यात घेतले. उर्वरीत आरोपी सरताज नबीलाल शेख, रोहीत शंकर हनुवते, बाबु नामदेव मिरेकर यांना म्हाडा कॉलणी येथुन ताब्यात घेणेत आलेले आहे.

दाखल गुन्हयात १) सनी रावसाहेब कांबळे वय २३ वर्षे रा.स.नं. १५२, शंकरमठ सम्राट स्वस्तीक जवळ मिरेकर वस्ती, हडपसर पुणे. २) अमन नवीद शेख वय २२ वर्षे रा गोसावीवस्ती, आसावरी माता मंदिर, स.नं.१०६, हडपसर, ३) सरताज नबीलाल शेख वय २० वर्षे रा. जुना म्हाडा, साई सोसायटी हडपसर, ४) रोहीत शंकर हनुवते वय २२ वर्षे रा. नवीन म्हाडा बिल्डींग नं. ३२, हडपसर पुणे ५) बाबु नामदेव मिरेकर वय ५४ वर्षे रा.स.नं. १०६, मिरेकर वस्ती, शंकरमठ, हडपसर पुणे यांना युनिट ०५, गुन्हे शाखेने १२ तासाचे आत शिताफिने पकडुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर,

पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अमंलदार प्रताप गायकवाड, अकबर शेख, शहाजी काळे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, राजस शेख, अमित कांबळे, राहुल ढमढेरे, दाऊद सय्यद, रमेश साबळे, दया शेगर, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here