मनसेला रुपाली ठोंबरेंचा जय महाराष्ट्र; पुण्यात मनसेला मोठ्ठा झटका,

0
Spread the love

पुण्यातील राजकीय वर्तुळात उडाली खळबळ.

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुण्यातील मनसेच्या माजी नगरसेविका व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठ्ठी खडबळ उडाली आहे.

त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.

त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे शहरात मोठे खिंडार पडले आहे. रुपाली पाटील या मनसेच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

विशेष म्हणजे राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुढील दोन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्याआधीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here