पुण्यातील नामांकित वैद्यकीय शाखेच्या “मुन्नाभाईंना” प्रसिध्द ज्वेलर्सच्या सोने चोरी प्रकरणात अटक,

0
Spread the love

२.५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. ( Hadapsar Police station Pune)

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुण्यातील नामांकित वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. रांका ज्वेलर्स, हडपसर येथे मास्क लावून आलेल्या दोन अनोळखी तरूणांनी, अंगठ्या दाखवण्यास सांगून दाखवलेल्या अंगठ्या पैकी ३ अंगठ्या निवडल्या, त्याच दरम्यान दोन तरूणांपैकी एक दुकानातुन बाहेर गेला.

त्यानंतर दुकानातील कामगार पाठीमागे वळून सोन्याचा ट्रे ठेवत असताना, दुकानात असलेला दुस-या तरूणाने ३ अंगठ्या घेवून दुकानाचे बाहेर पळाला. आधिच मोटारसायकलवर बसलेल्या आपल्या साथीदारसह भरधाव वेगाने निघून गेले. त्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर प्रकरणाचा हडपसर पोलीसांनी तपास सुरू केला असता, असे निष्पन्न झाले की, त्याच दिवशी हडपसर येथील घटनेच्या पुर्वी याच
तरूणांनी ब्ल्यु स्टोन ज्वेलर्स कोथरूड, या दुकानातुन अंगठी खरेदी करण्याचा बहाण्याने दुकानात जावून अशाच प्रकारे सोन्याच्या अंगठ्या दाखविण्यास सांगून अंगठी चोरून घेवून पळून गेल्याचा गुन्हा अलंकार पोलीस ठाण्यात (alankar police station) दाखल करण्यात आला होता.

हडपसर तपास पथकाकडून करण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही विश्लेषणातुन आणि तपास पथकाचे पोलीस अंमलदार शाहीद शेख, निखील पवार व प्रशांत दुधाळ यांना मिळालेल्या बातमीद्वारे हडपसर पोलीसांनी आरोपी अनिकेत हनुमंत रोकडे वय २३ वर्ष रा. राधाकुंज निवास, महात्मा गांधी कॉलेज जवळ,नागोबानगर, अहमदपुर लातुर व वैभव संजय जगताप वय २२ वर्ष रा. मु.पो.कैवाड केनवड ता.रिसोड जिल्हा वाशिम यांना ताब्यात घेतले.

दोन्ही तरूणांकडे तपास केला असता, दोन्ही आरोपी हे पुण्यातील दोन जुन्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात बी.ए. एम. एस व बी.एस.सी नर्सिंग चे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असून ते व्यसनाधिन आहेत. त्यांनी व्यसन, चैनी करीता तसेच मैत्रीणीला गिफ्ट देण्यसाठी वरिल चो-या केल्या असल्याची कबुली दिली आहे.


त्यांचेकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या ३६ ग्रॅम ७७० मिली ग्रॅम वजनाच्या एकूण ४ सोन्याच्या अंगठ्या तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेली युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण २ लाख ५० हजारांचा माल हस्तगत करण्यात
आलेला आहे.

सदरची कामगिरी ही नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५,यांचे मागदर्शना खाली बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर,अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरिक्षक (गुन्हे) राजु अडागळे,.

(गुन्हे) दिगबंर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार, प्रदीप सोनवणे, गणेश क्षिरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सुरज कुंभार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here