कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, कोंढवा भागात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून त्यातून निघणारा राडारोडा- डबर हा कुठे टाकला जात असल्याचा प्रकार हा काय नविन नाही.
परंतु पुणे मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणात राडारोडा टाकत असताना शासकीय कर्मचाऱ्यांने हटकलया प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मारुती हणमघर वय ४३ वर्षे, रा.दत्तवाडी पुणे यांनी फिर्याद दिली आहे. हकीकत अशी की काल १३ डिसेंबर रोजी कोंढवा ट्राफिक ऑफिसच्या पाठिमागे छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण कोंढवा खुर्द या पुणे महानगर पालिकेच्या मैदानावर यातील हणमघर हे आरोग्य निरीक्षक म्हणुन महानगर पालिका पुणे येथे नोकरी वर असून हणमघर यांना
पुणे महानगर पालिका सहायक आयुक्त वानवडी रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय यांनी कळविले की, कोंढवा ट्राफिक ऑफिसच्या पाठिमागे छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण कोंढवा खुर्द या पुणे महानगर पालिकेच्या मैदानावर कोणीतरी इसम विनापरवाना राडारोडा-डबर ट्रक खाली करीत आहे.
मिळालेल्या माहितीवरून हणमघर स्वतः तसेच वरीष्ठ आरोग्य निरीक्षक मुजावर हे महानगर पालिकेच्या मैदानावर राडारोडा डबर ट्रक गाडयांवरील चालक विनापरवाना त्यांच्या ताब्यतील ट्रकमधील राडारोडा डबर खाली करीत असताना विनापरवाना ट्रकमधील राडा रोडा डबर खाली करण्यास विरोध केला असता सरकारी काम करीत असताना अडथळा करुन ट्रकमधील डबर राडारोडा मैदानावर खाली करून तेथून पळून गेल्याची फिर्याद दिली आहे.