माजी गृहराज्यमंत्रीच्या मुलाच्या रुफटॉफ हॉटेलवर पुणे पोलिसांची कारवाई, कोंढव्यातील एनआयबीएम येथील ” द व्हिलेज” हॉटेल मध्ये चालू होता हुक्का.

0
Spread the love

दुसऱ्यांदा कारवाई झाल्याची माहिती आली समोर?

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

कोंढव्यातील एनआयबीएम येथील द व्हिलेज हॉटेल मध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर चालू असल्याने पुणे शहर पोलिसांनी धाड टाकून बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. सदरील हॉटेल ही माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलाची आहे. हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविल्या बद्दल द व्हिलेज हॉटेलचे मालक बाकेर रमेश बागवे यांच्यासह पाच जणांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाकेर बागवे (वय ३६, रा. भवानी पेठ, लोहियानगर), हरुन नबी शेख (वय २०, रा. पश्चिम बंगाल), बिक्रम साधन शेख (वय २०), अमानत अन्वर मंडळ (वय २२), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एनआयबीएम रोडवरील द व्हिलेज हॉटेलमध्ये चोरुन ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करुन दिला जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. त्यावेळी ५ जण ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे आढळून आले. तेथून हुक्काचे फ्लेवर व ९ हुक्का पॉट व इतर साहित्य असा २३ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

सदरील कामगिरी पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदिप बेडिस्कर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here