शुभम आदेंकरची देखील गेम होणार होती?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
किरकोळ भांडणावर पोलीस ठाण्यात एनसी दाखल, त्यानंतर थेट वनराज आदेंकरचा मर्डर. पोलिसही गेले चक्रावून. बंडु आंदेकर यांची मुलगी संजिवनी जयंत कोमकर व जावई जयंत लक्ष्मण कोमकर यांच्या अक्षता- अंकिता जनरल स्टोअर्स या दुकानावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई वनराज आदेंकर याच्या सांगण्यावरुन केली असल्याचा संशय संजिवनी व जयंत कोमकर यांना होता.
Video 👉 माजी नगरसेवक वनराज आदेंकर यांच्यावर गोळीबार
त्यानंतर १ सप्टेबर रोजी दुकानावर दगडफेक केली म्हणून तक्रार करण्यासाठी संजिवनी व जयंत कोमकर समर्थ पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आकाश सुरेश परदेशी याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी आकाशबरोबर वनराज, शिवम उदयकांत आंदेकर व अॅड. मनोज माने हे पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी संजिवनी व तिचा पती जयंत कोमकर यांनी आकाश याला पोलीस ठाण्यात लाथाबुक्क्यांनी व चप्पलेने मारहाण केली. शिवम आंदेकर याने ही भांडणे सोडवली.
👉 ब्रेकिंग न्यूज : पुण्यातील समाजसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक वनराज बंडू आदेंकर यांच्यावर गोळीबार, गणेश कोमकर यांनी घरगुती वादातून फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती.
त्यावेळी वनराज याच्या सांगण्यावरुन आकाश याने तक्रार दिली. असल्याचा संशय संजीवनीला आला होता. तसेच पोलिसांनी एनसी ही नोंद केली. वनराजच्या सांगण्यावरुन ही तक्रार नोंदविली गेल्याने संजिवनी हिने पोलीस ठाण्यातच “वनराज आम्ही तुला जगु देणार नाही.तू आमच्यामध्ये आला आहे.तू आमचे दुकान पाडण्यास सांगून आमच्या पोटावर पाय देतोय काय, तुला आज पोर बोलावून ठोकतेच,” असे म्हणाली.
या घटनेनंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वनराज व पुतण्या शिवम हे उदयकांत आंदेकर चौकात थांबलेले होते. त्यावेळी दुचाकीवरुन काही जण आले. शिवम व वनराज पळून जाऊ नये, अशा पद्धतीने तिघे समोरच थांबले. त्यानंतर आणखी काही दुचाकी वरुन टोळके आले. दुचाकीवरील मध्यभागी असलेल्याने तोंडावरील मास्क खाली केला तेव्हा तो पवन करताल असल्याचे शिवम याने ओळखले.
त्याने कमरेला लावलेले पिस्तुल काढून शिवमवर फायरिंग केले. परंतु शिवम सावध असल्याने तो खाली बसला. त्यामुळे तो वाचला. पवन याने वनराज याच्यावर फायरिंग केले.दुसऱ्या गाडीवरुन आलेल्या समीर काळे याने देखील पिस्तुल काढून वनराज याच्या दिशेने फायरिंग केले. परंतु, त्यांचा नेम चुकला. वनराज व शिवम पळून जाऊ लागले.
तेव्हा संजिवनी कोमकर व जयंत कोमकर यांनी राहत्या घराच्या बाल्कनीत उभे राहून “मारा मारा त्यांना सोडू नका जिवे ठार मारा,” असे म्हणून त्यांना चिथावणी दिली. त्यावेळी गाडीवरील इतरांनी त्यांच्या बरोबर आणलेले कोयते हवेत फिरवून पवन करताल याने “एक वर एक फ्री बोनस” असे बोलून त्यांच्या अंगावर धावले.तेव्हा शिवम हा पुढे पळून गेला. पण वनराज हा पळताना खाली पडला.आणि हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. तेव्हा पवन करताल, समीर काळे व इतरांनी वनराज याच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, मानेवर, छातीवर, हातावर वार करुन त्याला जीवे ठार मारले.
सूर्यकांत आंदेकर यांनी वनराजच्या खूनाबद्दल १५ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.आपल्याच बहिणीने व दाजीने सकाळी धमकी दिली असतानाही बेसावध राहिल्याने व ऐनवेळी पळता न आल्याने वनराज आंदेकर याला आपला जीव गमवावा लागला आहे. असे फिर्यादीत म्हणाले आहे.




