बेकायदेशीर जाहिरातीला आळा घालण्यासाठी पुणे महानगर पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त सपशेल फेल.
संजय काकडे यांना शह देण्यासाठी पुनित बालन यांना पुढे आणल्याची पालिकेत चर्चा?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
एखाद्या नागरिकांनी किंवा छोट्या कार्यकर्त्याने कार्यक्रमासाठी छोटेसे बॅनर लावले तर, तळ पायाची आग डोक्यात आली सारखी, करत पालिकेतील अधिकारी व कर्मचारी बॅनर काढून अथा फाडून मोकळे होतात. परंतु आज शहरभर बेकायदेशीरपणे जाहिराती करून पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडविला जात असताना, फक्त तोंडी आदेशा पलीकडे पालिका काहीच करत नाही.

दहीहंडीच्या अगोदरच शहरभर बेकायदेशीरपणे माणिकचंद ॲक्सेसरिक कंपनीने जाहिराती करून शहर विद्रुप केले आहे. आज सदाशिव पेठ, नारायण पेठ, बाजीराव रोड, टिळक रोड, गंज पेठ, शनिवार वाडा परिसर, कसबा पेठ, भवानी पेठ, व इतर भागात राजरोसपणे जाहिराती लावल्या आहेत.

पुर्ण शहरभर बेकायदेशीरपणे जाहिराती लावण्यात येत असताना, पालिका यंत्रणा झोपेचे सोंग घेत होती का? असा प्रश्न सजग नागरिक विचारत आहेत. पालिकेकडून परवानगी देण्यात आली किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी “पुणे सिटी टाईम्स” च्या प्रतिनिधींनी आकाश चिन्ह विभागात माहिती घेतली असता अशी कोणतीही परवानगी माणिकचंद ॲक्सेसरिक कंपनीला दिली नसल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

मग एवढया मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जात असतानाही, पालिकेला याचे गांभिर्य का नाही? मागच्या वर्षीचे ३ कोटी २० लाख थकीत असतानाही आज शहरभर बेकायदेशीरपणे माणिकचंद ॲक्सेसरिक ची जाहिरात होत असताना व पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होताना असतानाही,पालिका आयुक्त फक्त बघ्याची भुमिका घेत आहेत. साधे शहरभर विद्रुपीकरणाचे गुन्हे दाखल करण्याचा देखील विसर पडला आहे.
” काही ठिकाणी फक्त दाखवण्यासाठी कारवाई “

पुणे महानगर पालिकेच्या अगदी समोर माणिकचंद ॲक्सेसरिक ची जाहिरात बेकायदेशीर लावण्यात आली होती. त्या संदर्भात काही लोकांनी नाराजी व्यक्त केल्याने ती जाहिरात काढण्यात आली. तर अतिरिक्त आयुक्त पी. बी. पवार यांच्या तोंडी आदेशानुसार रविवार पेठ, दारूवाला पुल, सदाशिव पेठेतील काही माणिकचंद ॲक्सेसरिक ची जाहिरातीचे बॅनर काढून टाकण्यात आले. तर त्या ठिकाणी काही तासाने बॅनर लागल्याचे दिसून आले. परंतु तोंडी आदेश काढायची गरज काय होती? लेखी आदेश काढायला भिती कोणाची होती? की फक्त दाखवायचं, मी मारल्या सारखं करतो तु रडल्यासारखं कर. तातडीने कारवाईची मागणी सजग नागरिकांनी केली आहे.




