कारवाई झालेल्या इमारतीत नागरिकांनी घरे खरेदी करू नये महानगरपालिकेचे आवाहन
” पुणे सिटी टाइम्स इम्पॅक्ट “
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
पुणे: कोंढवा भागात बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच, काही विशिष्ट बांधकामांकडे अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप करताच कोंढव्यातील शिवनेरी नगर, गल्ली नंबर १ मधील एका अरुंद बोळात जाफर पठाण नावाच्या बिल्डरने तब्बल ९ मजल्यांची बेकायदेशीर बांधलेल्या इमारतीवर पुणे महानगर पालिकेने कारवाई केल्याने बेकायदेशीर बांधकामांवर करणाऱ्यांच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस इसहाक पानसरे यांनी पालिकेकडे तक्रार दाखल केल्यानंतर पुणे सिटी टाईम्सने बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेऊन पुणे महानगर पालिकेने बेकायदेशीर ताजमहालावर कारवाई केली आहे.

माहितीनुसार, या इमारतीचे बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत.बांधकामाचा दर्जा अत्यंत सुमार असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे.
पुणे महानगर पालिकेने स्लॅबला होल मारले आहे त्यामुळे सदरील इमारत कमवूकत झाली आहे. आता पुन्हा नवीन स्लॅब बांधल्यास ते धोकादायक ठरू शकते? यामुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांनी सदरील इमारतीतील घरे खरेदी करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे.
“पालिका पुन्हा कारवाई करणार “
कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा स्लॅब बनून काम सुरू केले जाते हे असे प्रकार नागरिकांसाठी जीवघेणा खेळ ठरू शकतो, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारवाई दरम्यान काही लोकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही ते हाणून पाडला आहे. जाफर पठाण यांनी पुन्हा बांधकाम केल्यास यापुढे मोठी कारवाई केली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
भाग्योदय नगर मध्ये नदिम गोलंदाजचा बेकायदेशीर बांधकामाचा थरार!
भाग्योदय नगर मध्ये नदिम गोलंदाज नावाच्या एका बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने एका अरूंद जागेत ८ मजल्यांचा “ताजमहाल” उभा केला आहे. त्या संदर्भात लवकरच भेटू या..





