कॉग्रेसचे लोकसभा उमेदवार रविंद्र धंगेकर व त्यांच्या ३५ ते ४० कार्यकर्त्यांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

पुणे लोकसभा उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.२ दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजप विरोधात आंदोलन केले होते.बेकायदेशीर पद्धतीने जमाव जमविल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी जो कायदा व सुव्यवस्था बिघडवेल त्यावर गुन्हा दाखल होईल अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र धंगेकर यांनी मतदानाच्या १ दिवसआधी म्हणजे १२ मे रोजी सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन केले होते. भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

परंतु त्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे पोलिसा आयुक्तांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कलम १४३, १४५, १४९, १८८ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५, लोकप्रतिनीधी अधिनियम १९५१ चे कलम १२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाची अवहेलना करत भाजप विरोधात आंदोलन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here