पुणे महानगर पालिका आयुक्त फक्त बेकायदेशीर होर्डींग धारकांना नोटीसा काढणार की प्रत्यक्षात कारवाई करणार?
आकाश चिन्ह विभाग फक्त झोपा काढतोय का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
अवकाळी पावसामुळे घाटकोपर मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. त्यात १४ लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर काही लोक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत.पुण्यात पुन्हा अनधिकृत होर्डिंग धारकांनी आपले तोंड वर काढले असून चार पैश्यांसाठी लोकांच्या जीवावर उठले आहे.

कोंढवा खुर्द शितल पेट्रोल पंपाच्या शेजारील इमारतीवर एकावर एक असे ४ होर्डिंग लागले आहे.वेलकम हॉल परिसरात अनधिकृतपणे ४ होर्डींग लावण्यात आल्या आहेत. तर कौसरबाग येथील नाल्यामध्ये कौसरबाग बकरा मंडीवर, थेट बेकायदेशीरपणे मोठ्ठी होर्डींग लावण्यात आली आहे. तर त्या समोर कापरे मळा येथे व कौसरबाग विजय पार्क शेजारी नाल्यामध्ये बेकायदेशीरपणे होर्डिंग उभ्या आहेत.

तसेच कमेला चौकात सुध्दा बेकायदेशीर होर्डींग लागलेले असल्याचे दिसून आले, आणि लुला नगर येथील कुणाला वाईन्स च्या टेरेसवर धोकादायकपणे एकावर एक असे जीव घेणा होर्डिंग लावण्यात आल्या आहेत.

जागोजागी बेकायदेशीरपणे लोखंडी स्ट्रक्चर उभा करताना कोणी विरोध देखील केला नाही. तर विशेष म्हणजे पुणे महानगर पालिकेतील आकाश चिन्ह विभागातील अधिकारी व निरिक्षक झोपले होते का?

स्ट्रक्चर उभा करताना लोखंडी साहित्य वापरताना हलगर्जीपणा करण्यात आला आहे. तोच हलगर्जीपणा कोंढवा करांच्या जीवावर बेतू शकतो.

सन ५ ऑक्टोबर २०१८ साली मंगळवार पेठ जुना बाजार येथे भर रस्त्यात होर्डींग पडल्याने ४ जणांना आपले जीव गमवावे लागले होते.तर काही जण मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे राहिले होते. परंतु आता घाटकोपर मध्ये घडलेली घटना लक्षात घेत पुणे महानगर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी १५६४ बेकायदेशीरपणे होर्डिंग असल्याचे सांगितले आहे.

१५६४ होर्डिंग उभे राहत असताना पालिका आकाश चिन्ह विभागातील उपायुक्त,निरिक्षक बघ्याची भूमिका घेत होते? खळखळून जागे झालेले पुणे महानगर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले हे आज १५६४ होर्डिंग अनधिकृत असल्याचे जाहीर केल्याने पुणे महानगर पालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. आयुक्त आता ठोस कारवाई करणार का? फक्त आदेश देऊन मोकळे होणार? याकडे लक्ष टिकून राहणार आहे.




