तुम्हाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही मी तुम्हाला बघुन घेईन,तुझी नोकरी घालवतो म्हणत पोलीसांच्या अंगावर गेला धावून,

0
Spread the love

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, वाहतूक पोलीसाला अरेरावी करून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून खुर्च्या फेकल्या प्रकरणी एका विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणेश नरूटे, पोलीस अंमलदार, भारती विद्यापीठ वाहतुक विभाग,पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

हर्षल बापुराव रोहिले,वय-२१,रा.लेन नं.३,शरदनगर चिखली याला अटक करण्यात आली आहे. काल कात्रज चौकात कोंढवा बाजुला जाणारे रोडचे जंक्शनला त्यानंतर कात्रज पोलीस चौकी येथे हर्षल रोहिले हा चारचाकी गाडी भरधाव वेगाने,धोकादायकरित्या चालवुन,सतत हॉर्न वाजवत असताना फिर्यादी नरूटे हे वाहतुक शाखेच्या वर्दीवर त्यांचे कर्तव्य बजावुन
वाहतुकीचे नियमन करीत असताना,त्यांनी रोहिले याची गाडी थांबवली,

परंतु त्याने गाडी न थांबता पुढे जावुन,इतर वाहतुक विभागाचे कर्मचारी यांचेशी हुज्जत घालुन,गाडीचे लायसन्स व कागदपत्रे दाखवण्यास नकार देवुन,तुम्हाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही मी तुम्हाला बघुन घेईन,तुझी नोकरी घालवतो,तु मला ओळखत नाही असे म्हणुन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचे अंगावर धावुन गेला.

फिर्यादी यांनी त्यास कात्रज पोलीस चौकी येथे आणल्यानंतर त्याने चौकीतील खुर्च्या व इतर साहित्य फेकाफेकी करून नुकसान करून, चौकीतील पोलीस अधिकारी यांचेबरोबर झटापटी करून त्यांना अपशब्द वापरून,ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here