कोंढव्यातील वाहतूकीमुळे स्थानिक नागरिक झाले बेहाल,

0
Spread the love

कोंढवा वाहतूक पोलीसांचे वाहतूक जामकडे दुर्लक्ष.

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, कोंढव्यातील वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला असताना वाहतूक पोलीसांचे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. कारण कोंढवा वाहतूक पोलीस फक्त कारवाईकडे आणि वाहने उचलण्यातच मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे.

आज लुलानगर ते फखरी हिल पर्यंत लांबच लांब रांगा लागत असून एकही वाहतूक पोलीस सदरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी दिसत नसल्याचे पाह्यला मिळत आहे. रोजच सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान लुलानगर येथे नव्याने बनविण्यात आलेले उड्डाण पूल ते फखरी हिल पर्यंतच वाहतूक मोठ्याप्रमाणावर जाम होत आहे.

कारण कमेला पासून येणाऱ्या वाहनांना रोड क्रॉससाठी मार्गदर्शनासाठी सिग्नल अथवा वाहतूक पोलीस नसल्याने कसे ही वाहने दाटल्याने उड्डाण पूलाचया दोन्ही बाजूस वाहतूक जाम होत असल्याने तासंतास ती वाहतूक जाम होत असून ती सोडवण्यासाठी स्थानिक नागरिकांना पुढाकार घ्यावा लागत आहे.

वाहतूक पोलीसांचे काम स्थानिक नागरिकांना अथवा स्वतः वाहन चालविणाऱ्यांना करावे लागत आहे. कोंढवा वाहतूक विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन रोजच्याच होणा-या वाहतूक जाम मधून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here