चारजणांना पोलीसांनी घेतले ताब्यात.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, दिवसाढवळ्या भरचौकात समिर मनूर याच्यावर गोळीबार करून त्याचा खून करणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. यांचा पैशांचे कारणावरुन आरोपी मेहबुब सैफान बलुरगी रा. जनता वसाहत, पर्वती पुणे व त्याचेतिन साथीदार यांनी दुचाकी गाडयां वरुन येवुन पिस्टल मधुन सहा गोळ्या झाडुन खुन केला होता.
त्याबाबत मयत समिर मनुर याचे वडिल हुसेन मनुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास जगन्नाथ कळकसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी खुन करणारे आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार आरोपीचा तपास करत असताना पोलीस अंमलदार राहुल तांबे व धनाजी धोत्रे यांना मुख्य आरोपी मेहबुब सैफान बलुरगी वय ३३ वर्ष रा. जनता वसाहत, पर्वती पुणे मार्केट यार्ड परिसरात असल्याची बातमी मिळाल्याने त्याला ताब्यात घेवुन अधिक चौकशी करता त्याने त्याचे साथीदार १) सुफियान फैयाज चौरी, वय १९ वर्ष रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा,
२) निलेश सुनिल कुंभार वय ३० वर्ष रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर व त्यांचा एक बाल साथीदार वय १७ वर्ष यांचे मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले.व त्यांचा बाल साथीदाराला कोरेगाव पार्क येथुन ताब्यात घेण्यात आले.
गुन्हयातील चारही आरोपी यांना गुन्हा घडल्या नंतर ८ तासात ताब्यात घेवुन अटक करुन गुन्हयात वापरलेले पिस्टल जप्त करण्यात आले आहे.सदरची कामगिरी राजेन्द्र डहाळे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, सागर पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, सुषमा चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट,जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संगिता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे),
यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे व तपास पथकांचे अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे,धनाजी धोत्रे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, मंगेश बोरुडे, राहुल शेडगे, रविंद्र भोरडे यांनी केली .