रॉबरी करण्यासाठी आणले होते पिस्टल.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, भवानी पेठेतील एका तरुणाला रॉबरी करण्याअगोदरच गुन्हे शाखा युनिट ६ ने कारवाई करून ताब्यात घेतले आहे.काल रात्री गुन्हे शाखा युनिट ६ कडील आधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये गस्त करत असताना पोलीस नाईक सकटे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,वॉचमेकर चाळ, भवानी पेठ,
पुणे येथे एका इसमाने रॉबरी करण्याकरिता पिस्टल आणलेले आहे. कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक यांनी सापळा रचुन समीर प्रकाश कोतवाल, वय ३४ वर्षे, रा. वॉचमेकर चाळ, भवानी पेठ यास ताब्यात घेतले.
समिरच्या कब्जातून एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने रॉबरी करण्याकरिता सदरचे पिस्टल आणल्याचे सांगितले.त्याच्याविरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता,पोलीस सह-आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे,अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा,श्रीनिवास घाडगे,
सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर, लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने,नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे,
रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास
तांबेकर यांनी केली आहे.