कोंढव्यात अवैध बांधकाम ईमारतीत शाळा सुरू करण्याचा प्रयत्न; विध्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
Spread the love

लवकरच कारवाई करण्यात येईल पुणे महानगर पालिकेचे आश्वासन?

तर इमारत बांधकाम करताना लाखो रूपयांचा जमिन उत्खनन ( रॉयल्टी) बुडवल्याचे आले समोर?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान

पुण्यातील कोंढवा मध्ये अनधिकृत बांधकामे करून शाळा उभारणी करून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घातले जात आहे. सदरील प्रकार हा कोंढव्यातील सर्वे नं ४६ साईबाबा नगर गल्ली नंबर ९ येयील तहा ट्रेडर्स शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत घडत आहे. याची तक्रार काही नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सकडे केली आहे.

त्याची दखल घेत पालिकेकडे अधिक माहिती जाणून घेतली असता पुणे महानगर पालिकेने इमारत बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर पुण्यातील शिक्षण विभागाकडे माहिती घेतली असता अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. आणि परवानगी दिली असेल तर त्वरित कारवाई केली जाईल असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

पाच पाच मजली इमारत अनधिकृत बांधकामे होत असताना पुणे महानगर पालिकेतील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष का करत होते? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सदरील बेकायदेशीर इमारत अकिल सिद्दीकी यांनी बांधली असून त्या इमारतीला यापूर्वीच इमारत बेकायदेशीर असल्याची नोटिस बजाविण्यात आलेली आहे.सदरील बेकायदेशीर इमारतीवर लवकरच कारवाई करून पाडण्यात येईल अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

“सदरील जागेत अवैध गौण खनिज उत्खनन करताना फोटो”

” इमारत बांधकाम करताना अवैधपणे गौण खनिज “

इमारत बांधकाम करण्यापूर्वी जमीन उत्खनन करताना महसूल विभागाची रितसर परवानगी घ्यावी लागते व रॉयल्टीची रक्कम भरावी लागते. परंतु सदरील बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. आता ती रक्कम वसूल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली असून अंदाजे १० ते ११ लाखांपर्यंत दंड वसूल करण्यात येईल असे जाणकारांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here