एका डिजेवर राग काढल्याने नाराजीचे सुर.
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही तर कधी कोणाला बलीचा बकरा बनविला जाईल या बद्दल काही नेमच नाही. पुणे शहरातील एका मंत्र्यांसमोर एका पक्षाचा गाणा वाजल्यानंतर थेट मंत्र्यांची सटकली असल्याची चर्चा पुणे शहरात रंगली आहे.
राजकारण एवढ्या खालच्या दर्जावर गेल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.पुणे शहरातील रास्ता पेठेत दुधभट्टी भागात दरवर्षी सगर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी रेडे आणले जातात.
व त्यांना मान दिला जातो. यंदाही कोरोनाच्या दोन वर्षांनंतर दुधभट्टी भागात सगर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात असल्याने त्यांनी याठिकाणी भेट दिली. तेव्हा पाटील येताच मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणी लावण्यात आली होती.
एवढच करून डीजेवाला थांबला नाही. तर त्याने चक्क पाटील यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी पुन्हा….” हे गाणं वाजविण्याचे धाडस केलं आहे. याप्रकरणी तिथे गाणं वाजवणाऱ्या डीजेला ताब्यात घेतले आहे.
दिवाळीनिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मंत्री पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यापमाणेच पुण्याचे पालकमंत्री दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना भेटी देऊन शुभेच्छा देत होते. त्याच वेळी रास्ता पेठेत सगर कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आले होते.
त्यांच्यासमोर “राष्ट्रवादी पुन्हा…”ही गाणं मोठ्या आवाजात स्पीकरवर लावले. हे धाडस डीजेला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी हे गाणं वाजवणाऱ्या डीजेला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी, त्याने साऊंड सिस्टीम उभारण्यासाठी परवानगी घेतलेली नव्हती असं कारण दिलं आहे.