बोगस आर्मी ऑफिसर कर्नलला गुन्हे शाखा युनिट ४ कडून अटक

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पठाणकोट, पंजाब येथील गुन्ह्यात पाहिजे असलेला बोगस आर्मी ऑफिसर (कर्नल) यास पोलिसांनी अटक केली आहे. संजय रघुनाथ सावंत, वय ५५, रा. बोपोडी, असे त्याचे नाव आहे. सावंत हा बोगस अधिकारी बनुन त्याने पठाणकोट येथे आर्मी मध्ये नोकरी लावतो असे सांगुन ब-याच उमेदवार व पालकांकडुन लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती.

सदर गुन्ह्यात संजय सांवत हा पाहिजे आरोपी असल्याची माहिती
आर्मी इंटेलिजन्सने गुन्हे शाखा युनिट-४ यांना दिली होती. पोलीस
निरीक्षक,जयंत राजुरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार, राजस शेख, प्रविण भालचीम,संजय आढारी यांचे व मिलीट्री इंटेलिजन्स यांचे संयुक्त तपास पथके तयार करुन आरोपी याचा
शोध घेत होते.

संजय सावंत याचा अचुक पत्ता व पुर्ण माहिती नसल्याने तो मिळून येत नव्हता. त्याची गोपनीयरित्या माहिती मिळवली असता संजय सावंत हा डीओडी डेपो, देहुरोड येथे लेबर म्हणुन नोकरीस होता. सुमारे दोन वर्षापुर्वी तो सेवानिवृत्त झाला असुन सध्या पिंपळेगुरव येथे वास्तव्यास असुन तेथेच रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत होता.

आठ दिवस सदर पथकाने सुमारे १५० ते २०० रिक्षाची तपासणी
करून, संजय सावंत याचा अचुक शोध घेतला.पोलीस निरीक्षक, जयंत राजुरकर यांनी पठाणकोट पोलीसांशी संपर्क साधुन,आरोपीची माहिती मिळालेबाबत कळविले.

त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी पठाणकोट येथील पोलीसांचे तपास पथक पुणे येथे आल्यानंतर युनिट-४ कडील अधिकारी व अंमलदार यांनी स्थानिक मिलीट्री इंटेलिजन्सचे अंमलदार यांचे सोबत जाऊन आरोपी संजय सावंत यास ताब्यात घेऊन, त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.

सदरची उल्लेखनीय कामगिरी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस अंमलदार,राजस शेख, संजय आढारी,प्रविण भालचीम या युनिट ४ चे पथकाने व मिलीट्री इंटेलिजन्स यांचे संयुक्त पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here