बिल्डर अतुल गोयल यांचे स्पष्टीकरण.
पुणे सिटी टाईम्स ; प्रतिनिधी. स्वताच्या फायद्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला अटकविण्यात आल्याचे स्पष्टीकरण अतुल गोयल प्रसार माध्यमांशी बोलताना दिले आहे. माहिती अशी की, बिबवेवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रस्तावित करण्यावरून नगरसेविकेचा पती व प्रतिष्ठीत बिल्डर गोयल गंगा ग्रुप यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते.
बिबवेवाडीवाडी येथील स.नं. ६५९/१०, ६५९/१२बी, ६६०/२ आणि ६६०/४ जमिन फिर्यादी यांचे वडिल यांनी २००६ मध्ये कुलमुख्यत्याद्वारे लिहून दिली होती. यामध्ये फिर्यादी यांचे वडिल यांनी स्वत: वारस असल्याचे गोयल गंगा ग्रुपला कळविले होते. त्याअनुषंगाने सन २००९ मध्ये गोयल गंगा प्रमोटर्सकडून नोंदणीकृत खरेदीखत करण्यात आले.
सदर नोंदणीकृत खरेदी खतानंतर कोणत्याही वाली वारसाने तक्रार वा-वाद निर्माण केला नव्हता. परंतू जून २०२० पासून याबाबत वाली वारस असल्याचे सांगून वकिलांकडून नोटीस पाठवून लिटीगेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते.सदर जमिनीच्यावादातून खंडणी विरोधी पथक, झोन-१ यांच्याकडे बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली होती तद्नंतर बिल्डर गोयल गंगा यांच्यावतीने कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती.
यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे दि.२४ नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांनी स्वत:च्या वडिलांसह गोयल गंगा प्रमोटर्सचे अतुल गोयल व अमित गोयल यासह अन्य एका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.यावेळी बिल्डर अतुल गोयल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, फिर्यादी यांचे वडिल यांनी कुलमुखत्यार पत्राद्वारे जमिन विषयक व्यवहार केला होता.
त्यात त्यांनी वाली वारस स्वत: असल्याचे कळविले होते. सदर विषय हा तांत्रिकबाबी पाहता सिव्हील स्वरूपाचा असताना त्याचा फौजदारी स्वरूपाचा प्रयत्न करण्यात आला व आमच्याविरूद्ध चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच सदर जागेवर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम केले नसल्याने स्पष्ट केले. स्वत:च्या फायद्यासाठी फिर्यादी यांनी स्वत:च्या वडिलांसह आमच्यावर खोटे आरोप केले आहेत, तर कायद्यावर आम्हाल विश्वास असून आम्हालअ नक्कीच न्याय मिळेल असे सांगितले.