अखेर पुणे महानगर पालिकेचं ठरलं… कोंढव्यात होणार कारवाई. 

0
Spread the love

 

बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

बेकायदेशीरपणे बांधकाम करणाऱ्यांवर मोफा अंतर्गत कारवाई करा.

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुणे शहरातील उपनगर भाग असलेल्या कोंढव्यात आता पुणे महानगर पालिकेने हातोडा चालविण्याचे अखेर ठरवलं आहे. बघता बघता आज कोंढवा मध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकाम करून, लाखो रुपयांची उलाढाल होत असताना,यात पुणे महानगर पालिकेचा एक रुपयाहीचा काहीच फायदा होत नाही.

परंतु बिल्डर धनाजींचा फायदा यात नक्कीच होत आहे. गेल्या आठवड्यात भरात पुणे सिटी टाईम्सने बातम्यांचे “तीन भाग” लावले असता,‌धनाजींनी साम दाम दंड भेद चा वापर केला?

परंतु त्याला भिक न घालता कारवाईचा तकादा चालू असल्याने अखेर पुणे महानगर पालिकेने हातोडा चालविण्याचा निर्णय घेतला असून येता दोन तीन दिवसांत कोंढवा बुद्रुक,कोंढवा खुर्द,‌ मिठानगर, भाग्योदय नगर, शिवनेरी नगर, आंबेडकर नगर, काकडे वस्ती पठाण चौक येथे कारवाई होणार असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे.

त्यात प्रामुख्याने १) आंबेडकर नगर, माने हॉस्पिटल समोर (उजेर बिल्डर) कोंढवा बुद्रुक ,२) सर्वे नं ४२ मदिना टॉवर , हसनैन मस्जिद जवळ कोंढवा खुर्द,कातील बिल्डर व इतराचे‌ काम चालू आहे.३) भाग्योदय नगर गल्ली नं ४ विनर पॅलेस शेजारी,कोंढवा खुर्द. ४) सर्वे नं ४ काकडे वस्ती पठाण चौक, महावीर स्वामी चौक, कोंढवा बुद्रुक , येथे माने बिल्डरचा काम चालू आहे.

५) मिठानगर राजीव गांधी इंग्लिश प्रायमरी स्कूल शेजारी, कोंढवा खुर्द. ६) मिठानगर अलफलाह मस्जिद जवळ हाजरा बिल्डर, कोंढवा खुर्द.७ ) भाग्योदय नगर गल्ली नं १८, फाइव स्टार बेकरी शेजारी इक्बाल बिल्डर,‌कोंढवा खुर्द.८) शिवनेरी गल्ली नं २,शाहरूख शेख व अल्ताफ पठाण बिल्डर. कोंढवा खुर्द.

असे बांधकाम पाडण्याची कारवाई तर होणार परंतु बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मोफा कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे व पुणे पोलिस आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.

 

” पालिकेच्या किरकोळ कारवाईमुळे नागरिकांचे जीव धोक्यात? ” 

 

पुणे महानगर पालिकेतील काही अधिकारी कोंढवा मध्ये कारवाई दाखवण्यासाठी किरकोळ कारवाई करतात, म्हणजे पहिला व दुसऱ्या स्लॅबला होल मारून कारवाई दाखवून मोकळं होतात. परंतु त्या नंतर पुणे महानगर पालिकेतील अधिकारी कर्मचारी आणि धनाजी बिल्डरांना काही देणेघेणे नसून फ्लॅट खरेदी करणाऱ्या नागरिकांना धोकादायक आहे. होल मारल्यानंतर स्लॅबची मजबूती संपते, त्या नंतर धनाजीराव बिल्डर ते स्लॅब भरून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे फ्लॅट विकतात. कधी एखाद्या भूकंप आला तर ते निकृष्ट दर्जाचे काम झटकन खाली पळून जाईल. याने मोठ्ठी जीवीत हानी होईल यात शंकाच नाही. म्हणून पालिकेने संपूर्ण बांधकामच पाडून टाकावे. पुर्ण बांधकाम पाडण्यास अडचण निर्माण होत असेल तर,‌ जेवढ्या मजलयांचे काम झाले आहे त्या सर्वच्या सर्व स्लॅबला खड्डे मारण्यात यावे. जेणेकरून पुन्हा दुरूस्तीच करता येणार नाही. क्रमशः 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here