मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न करता काहींनी सेटलमेंट मारल्याचे सोर्सच्या माहितीतून आले समोर.
माने बिल्डरने कमीशन न दिल्याने एका नागरिकांने कोंढवा पोलिस ठाण्यात केली तक्रार.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
कोंढवा मध्ये बेकायदेशीरपणे बांधकाम करून कामगारांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साधने न पुरवून कामगारांचे जीव धोक्यात घातले जात असल्याचे अनेक बांधकामाच्या ठिकाणी दिसून येत आहे. तर सुरक्षा साधणे नसल्याने, काही कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच एक प्रकार समोर आला असून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या धनाजी बिल्डरांनी प्रकरण दडपल्याची माहिती समोर आली आहे.
कोंढवा खुर्द सर्वे नं ४२ हसनैन मस्जिद जवळ, मदिना टॉवर शेजारी, हाजरा बिल्डर इक्बाल व माने यांचे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे. सदरील जागाही २ गुंठ्याची असून त्या जागेत तब्बल ६ मजली इमारत बेकायदेशीर उभी केली आहे.
तसेच बांधकाम चालू असताना, कामगारांना सुरक्षा साधने पुरवणे कामागार कायद्यानुसार बंधनकारक असताना ती साधने न पुरविल्याने काही महिन्यांपूर्वी तेथे कामावर असलेला कामगार दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला होता. त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला दवाखान्यात पाठवले होते.
परंतु ते प्रकरण ताजे असतानाच, त्या कामगाराच्या वडीलांचा त्याच ठिकाणी दुसरा मजल्यावरून पडून अपघात झाला होता. त्या गृहस्थाला आजूबाजूच्या लोकांनी उचलून बिल्डर माने याला फोन करून सदरील गृहस्थ खुप जखमी झाल्याची माहिती दिली होती.
तर माने, इक्बाल येण्याची वाट न पाहता त्या गृहस्थाला इक्बाल बिल्डर याच्या भावाच्या,पारगे नगर येथील केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.परंतु तो गृहस्थ बचावणार नसल्याचे केअर हॉस्पिटलला जाणवल्याने, त्याला ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. परंतु त्या गृहस्थाची श्वास नलीका फाटल्याने तो “संपत” नावाचा ५० वर्षा गृहस्थ दगावला.
तो मृतदेह तातडीने युपीला पाठविल्याची चर्चा आहे.परंतु त्याची कोंढवा पोलिसात नोंद न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या प्रकरणात आर्थिक साटेलोटे झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. तर अधिक माहितीसाठी कोंढवा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. क्रमशः
माने बिल्डरने कमीशन बुडविल्याची कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार….
हाजरा डेव्हलपर माने यानी एकाला मध्यस्थी करून खरेदी विक्रीचा व्यवहार केला होता.तो व्यवहार करताना ४ लाख ८० हजार कमीशन देण्याचे माने याने कबूल केले होते. परंतु तो व्यवहार होऊन कित्येक महिने झाले तरी कमीशन मिळाला नसल्याने, माने विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.