पोलिस आयुक्त S.S ची खरडपट्टी काढणार का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांवर वचक निर्माण करत सर्व धंदे बंद करण्याची सक्त ताकीद दिली होती. परंतु काही दिवस अवैध धंदे बंद ठेवून आता अवैध धंदे करणाऱ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहेत.
चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे अनेक ठिकाणी स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे पुणे सिटी टाईम्सच्या निर्दशनास आणून देण्यात आले आहे. एका तासाचे तब्बल ५ हजार रुपये घेत असल्याचे ऑनलाईन ट्रांजेक्शन मधून दिसून आले आहे. सर्व सामान्य नागरिकांना अवैध धंदे दिसून येत असले तरी सामाजिक सुरक्षा विभागाला काहीच दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
खराडी येथे तब्बल ८ स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू होता. १) Crystal 5 spa, २) Raven spa, ३) Lexus spa, ४) Eden Thai spa, ५) Oceanic spa kharadi, ६) Miracle spa, ७) Feel touch spa, ८) Regal spa kharadi,९ ) Blue sea spa vadgoan Sheri, असे अनेक स्पा मध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे बंद म्हणजे बंदच म्हणटले होते. परंतु सामाजिक सुरक्षा विभागाच्या नाकाखाली सदरील धंदे सुरू असल्याने, सामाजिक सुरक्षा विभागाने पोलिस आयुक्तांच्या सक्त ताकीदीला एक प्रकारे खो… च दिला आहे?
काही कारवाई दाखवण्यासाठी असल्याने ते दाखवून आपण किती प्रामाणिक काम करतोय हे खाटाटोप आयुक्तांना दाखवण्यासाठी केला जात असला तरी पुणेकर मात्र नजर ठेवूनच आहेत. आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार सामाजिक सुरक्षा विभागाची झाडाझडती घेणार का? असा प्रश्न आज पुणेकरांनी उपस्थित केला आहे.