पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचा मिलिंद एकबोटे, पतीत पावन संघटनेचा स्वप्नील नाईक यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. अद्याप मिलिंद एकबोटे याला अटक केलेली नाही, अशी माहिती पोलीसांकडून मिळाली आहे. जमाव जमवणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरसखाना पोलीस ठाण्यात एकबोटे व नाईक सह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
यादरम्यान कसबा पेठेतल्या पवळे चौकात देखील पूजेचा कार्यक्रम देखील पार पडला. पुण्यश्वर बचाव समितीने व इतर संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. याला मिलिंद एकबोटे, स्वप्नील नाईक व इतर उपस्थित होते.
पंरतु या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांकडून घेतली नव्हती.बेकायदेशीर जमाव जमवून तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.