सुर्य मावळल्यानंतरही सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननावर कारवाई का नाही?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) “अजहर खान”
पुणे शहरातील मध्यवस्तीत सायंकाळी अवैध गौण खनिज उत्खननाचा खेळचालू असताना महसूल यंत्रणा “कुंभकर्णा” सारखी झोप घेत असल्याचे समोर आले आहे.
सुर्य मावळल्यानंतर कुठल्याही प्रकारचे गौण खनिज उत्खनन करू नये असे नियम असताना व उत्खननाची परवानगी देताना सदरील परवानगीत अट घातलेली असताना पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने सायंकाळी अवैध गौण खनिज उत्खनन करण्यात असल्याचा प्रकार पुणे सिटी टाईम्सने उजेडात आणला आहे.
मौजे गुलटेकडी जमीन स.नं.५१३/अ १, ५१३ब/१,५१४/१, सि.स.नं.३६/१, ३७/१ व ३८ फा.प्लॉट येथे गौण खनिज उत्खननाची परवानगी संपलेली असतानाही आजरोजी अवैध गौण खनिज चालू असताना पुणे शहर तहसिलदार कार्यालयाच्या यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.
विशेष म्हणजे सदरील ठिकाणी सायंकाळी सुर्य मावळल्यानंतर गौण खनिज होत असल्याचे तहसिलदारांचे निदर्शनास आणून देऊनही त्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले आहे? सदरील ठिकाणी सायंकाळी गौण खनिज चालू असल्याचे व्हिडिओ ७ वाजून ५० मिनिटांनी तहसिलदार राधिका हावळ-बारटक्के यांच्या व्हाट्सअपवर व मंडल अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअपवर व्हिडिओ पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींने सेंड केले होते,
तहसिलदार यांनी त्वरित दखल घेऊन सदरील ठिकाणी कारवाई करणे अपेक्षित होते.परंतू असे न केल्याने २ मार्च रोजी देखील सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी पुन्हा अवैध गौण खनिज उत्खनन चालू असल्याचा व्हिडिओ पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींच्या हाती आले आहे.
तहसिलदारांनी ठोस कारवाई केली असती तर आज या अवैध गौण खनिज उत्खनन करणा-यांचे धाबे दणाणले असते, परंतु कारवाई न झाल्याने अवैध उत्खनन करणा-यांची हिम्मत वाढली आहे. कारवाई होत नसल्याने बांधकाम व्यावसायिकांन सोबत साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर सदरील प्रकरणात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. क्रमशः