हडपसरमध्ये बेकायदा होर्डिंगवर पालिकेचा कारवाईचा बडगा

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.

ता २४: हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हददीतील बेकायदा होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत हंडेवाडी डीमार्ट परिसरातील ४० x ३० दोन होर्डिंग हटविण्यात आले.

महापालिकेचे परवाना आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्या आदेशानुसार परिमंडळ चारचे उपायुक्त जयंत भोसेकर, परिमंडळ क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त रवी खंदारे यांच्या नियंत्रणाखाली उपअधीक्षक आनंद खेमसे, परवाने निरीक्षक योगेश खोमने, विजय थनवाल,कुनाल कांबळे स्वागत शेंडगे, यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

विद्रूपीकरणस कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत होर्डिंग, पोस्टर, बॅनर लावणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा फास आवळला आहे. प्रभागातील रस्ते, पदपथ, चौक, होर्डिंगमुळे विद्रूप होणार नाहित,

याकड़े लक्ष देवून, कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकऱ्यांना देण्यात आले आहेत. यापुढे कारवाईत सातत्य राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त परवाना आकाशचिन्ह विभाग माधव जगताप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here