बेकायदेशीर होर्डिंगधारकांना पाठीशी घालणाऱ्या आकाशचिन्ह परवाना निरीक्षकावर कारवाईची मागणी.

0
Spread the love

दिवाळीपूर्वीही व आताही पुणे महानगरपालिकेचा निघतोय दिवाळा?

बेकायदेशीर होर्डिंगधारकांनी कमावली लाखोंची माया!

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.

गेल्या काही दिवसांपासून कोंढवा, कौसरबाग येथे बेकायदेशीर होर्डिंगबाबत पुणे सिटी टाईम्स सातत्याने पाठपुरावा करत आहे. या प्रकरणात आकाशचिन्ह परवाना निरीक्षकाची तडकाफडकी बदलीही झाली. त्यानंतर एका जाडजूड कर्मचाऱ्याकडे (ज्याला गेंड्याची कातडी पांघरलेली आहे असे म्हणता येईल) कार्यभार सोपविण्यात आला.

परंतु हा कर्मचारीही केवळ बोलबच्चनच ठरला. “आज कारवाई करतो, उद्या कारवाई करतो, कारवाईसाठी मोठा फौजफाटा मागविला आहे, दोन दिवसांत कारवाई होईल, आता कारवाई झाल्यावरच तुम्हाला कॉल करतो,” अशी बनवेबाजी करून पुणे महानगरपालिकेला ठगणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या या अधिकाऱ्याविरोधात पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना भेटून कारवाईची मागणी करण्यात आली.

पुणे : कोंढव्यात अनधिकृत होर्डिंगचे साम्राज्य, परवाना निरिक्षकाकडून उपायुक्तांच्या आदेशाला थेट केराची टोपली.

हकीकत अशी की, कोंढवा खुर्द वेलकम चौकात एका राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचे बेकायदेशीर होर्डिंग राजरोसपणे उभे आहे. त्यापुढे कापरे मळा व मेफेअर समोर तसेच इतर ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंगचे जाळेच उभे राहिले आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेचा महसूल बेकायदेशीर होर्डिंग उभारणाऱ्यांच्या खिशात जात असल्याने पुणे सिटी टाईम्सने याविरोधात आवाज उचलला.

कोंढवा ‌: बेकायदेशीर होर्डिंगकडे दुर्लक्ष करणं निरिक्षकाला भोवलं, निरिक्षकाची उचलबांगडी.!

दिवाळी सुरू होण्यापूर्वी सर्व होर्डिंगवर बेकायदेशीररित्या जाहिरातीही चमकू लागल्या. त्यावर कारवाईसाठी आकाशचिन्ह परवाना निरीक्षक भारत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला, तरीही होर्डिंगवर कारवाई झाली नाही.

दिवाळीच्या तोंडावर “कारवाई नक्कीच होईल,” असे आश्वासन दिले; परंतु तेही केवळ बोलबच्चनच ठरले. “दिवाळी झाली अन् पालिकेचा निघाला दिवाळा!”

शेवटी कारवाई झाली नाहीच. आजही बेकायदेशीर होर्डिंगधारकांचे खिसे गरमागरम होत असल्याने अखेर भारत गायकवाड यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयुक्त नवल किशोर राम व उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे. गायकवाड यांच्याविरोधात कारवाई झाली नाही, तर लोकायुक्तांकडे दाद मागण्यात येईल. आता भारत गायकवाड यांच्याविरोधात काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here