पुणे : कोंढव्यात अनधिकृत होर्डिंगचे साम्राज्य, परवाना निरिक्षकाकडून उपायुक्तांच्या आदेशाला थेट केराची टोपली.

0
Spread the love

निरिक्षकाकडून अर्धवट कारवाई,तर कारवाई केलेला लोखंडी सांगाडा मग गेला कुठे?

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

कोंढव्यात अनधिकृत होर्डिंगचे साम्राज्य पसरले असतानाही आकाश चिन्ह परवाना निरिक्षकाकडून सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग लावण्यात आल्या असल्या तरी कारवाई मात्र शुन्य? बेकायदेशीर होर्डींग लावून त्यावर लाखो रुपयांची जाहिराती लावून जाहिरातदार लखपती बनत आहे.तर पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे सिटी टाईम्सने अनधिकृत होर्डिंगची बातमी लावली असता आकाश चिन्ह परवाना उपायुक्त संतोष वारूले यांनी तात्काळ कारवाईचे आदेश परवाना निरिक्षक मिलिंद पांगारे यांना दिले होते. कारवाईचे आदेश असतानाही मिलींद पांगारे हे कारवाईसाठी टाळाटाळ करत होते.

१५ दिवसानंतर वेलकम चौकातील ४ होर्डिंग रात्री पाडण्यात आले, तर पुणे सिटी टाईम्सने कारवाईचे लोखंडी सांगाडा उचलून नेऊन कारवाईचा खर्च संबंधित होर्डिंग धारकाकडून वसुल करण्याची मागणी केली असता, मिलिंद पांगारे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

परंतु त्या सांगडयाचे काय झाले? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. तर कापरे मळा येथील २ होर्डिंग व कौसरबाग येथील नाल्यावरील होर्डिंगवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई का करण्यात येत नाही या संदर्भात पांगारे यांना प्रश्न विचारले असता भोपळे चौकात फिरवल्यागत फिरवत आहे.

अश्या कामचुकार परवाना निरिक्षकावर पालिकेचा महसूल बुडवण्यास होर्डिंग धारकांना मदत केल्याप्रकरणी पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम व आकाश चिन्ह परवाना उपायुक्त संतोष वारूले कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष टिकून राहिले आहे. क्रमशः 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here