भाग ३ | पुणे सिटी टाईम्स एक्सक्लुझिव्ह : पुण्यातील महसूल विभागात हाई-टेक भ्रष्टाचार? खालपासून वरपर्यंत सर्वच आलबेल! गौण खनिज उत्खनन विभाग म्हणजे सोन्याची खाण? मंडल अधिकाऱ्यांचा पंचनाम्यांचा खेळ उघड!

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

सोन्याची खाण शोधायला आता अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळ नसल्याने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुणे शहरातच सोन्याची खाण शोधली आहे का? खरंच!

गौण खनिज उत्खनन म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोन्याची खाण म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पुणे शहर मंडल अधिकारी आणि त्यांच्या खाजगी एजंटांचा पंचनाम्यांचा खेळ उघडकीस आला आहे. पंचनामा करताना खाजगी एजंट व कॅन्डिडेट म्हणून वापर केला जात असतानाही सगळे आलबेल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे शहर मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांच्या गेल्या काही महिन्यांच्या पंचनामा अहवाल पुणे सिटी टाईम्सने पाहिले असता, सोन्याच्या खाणीचे रक्षण दोन एजंट-कॅन्डिडेट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे एजंट-कॅन्डिडेट फक्त सोन्याच्या खाणीचेच रक्षण करत नाहीत, तर माल-मालाचेही रक्षण करत असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून मिळाली आहे.

१) मौजे पुणे शहर येथील ताडीवाला रोड, जे.एस.पी.एम. कॉलेज शेजारी, नायडू हॉस्पिटल स्मशानभूमीच्या एन्ट्रीजवळ रात्री अवैध गौण खनिज उत्खनन चालू असल्याची तक्रार. पुष्पा गोसावी यांनी २४ डिसेंबर २०२५ रोजी अहवाल सादर केला आहे. त्यात प्रणव जगदाळे (रा. भवानी पेठ) याने पंच म्हणून सही केली आहे. भवानी पेठेतील जगदाळे तेथे कसे आणि का पोहोचले?

२) बिबवेवाडी येथील एका सर्वे नंबरमध्ये मंडल अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यातही प्रणव जगदाळे (रा. भवानी पेठ) आणि मंथन शिंदे (रा. शुक्रवार पेठ) यांनी पुन्हा पंच म्हणून सही केली आहे. भवानी पेठ आणि शुक्रवार पेठेतील पंच बिबवेवाडीत कसे चालतात?

३) मौजे एरंडवणा सि.स.नं. १११२ मधील जागेत मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांनी १९ जून २०२६ रोजी अहवाल सादर केला. त्यातही प्रणव जगदाळे (रा. भवानी पेठ) व मंथन शिंदे (रा. शुक्रवार पेठ) या पंचांनी सही केली आहे. ते का?

४) स.नं. ८, सिताराम पार्क, सोमवार पेठ येथील गौण खनिज उत्खननाबाबतची तक्रार. ३० जानेवारी २०२६ रोजी मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांचा अहवाल. त्यातही प्रणव जगदाळे व मंथन शिंदे यांनी सही केली आहे. म्हणजे सोन्याच्या खाणीचे रखवालदार आहेत का?

५) सोमवार पेठ २६/२७, सनशाइन हॉटेल, माळी महाराज मठ येथे चालू असलेल्या गौण खनिज संदर्भातील तक्रार. मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांनी पंचनामा अहवाल सादर केला. त्यातही प्रणव जगदाळे व मंथन शिंदे यांनी सही केली आहे. इथे काहीतरी गडबड आहे की सगळेच काळे आहे!

६) मौजे एरंडवणा सि.स.नं. ६९/सी येथील मिळकतीत मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांनी अहवाल सादर केला. त्यातही पंच म्हणून मंथन शिंदे, प्रणव जगदाळे व इतर एकाने सही केली आहे. मंडल अधिकाऱ्यांच्या किती जवळचे हे दोघे आहेत, हे यातूनच दिसून येते.

७) मौजे शिवाजीनगर सि.स.नं. ७७२/फा. प्लॉट २२५ मिळकतीमधील तक्रार. गौण खनिज उत्खननाचा अहवाल मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी तहसीलदारांकडे सादर केला. त्यात पंच म्हणून प्रणव जगदाळे व इतर एकाने सही केली आहे.

८) मौजे शिवाजीनगर, भांबुर्डा सि.स.नं. १२३१/बी फा. प्लॉट ६१७/बी या मिळकतीमध्ये गौण खनिज उत्खननाबाबतची तक्रार. अहवाल २१ मे २०२६ रोजी तहसीलदारांकडे सादर. पंच म्हणून सही करणारे मंथन शिंदे व इतर.

९) मौजे मंगळवार पेठ, न्यू प्रोजेक्ट ११७ या मिळकतीमधील गौण खनिज उत्खननाची तक्रार. मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांचा ९ एप्रिल २०२६ रोजीचा अहवाल. त्यातही प्रणव जगदाळे पंच म्हणून सही केली आहे.

१०) मौजे बिबवेवाडी सि.स.नं. ५७८/५७९ या मिळकतीमध्ये डोंगर सपाटीकरण झाल्याने वाद पेटला. पंचनामा अहवाल मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांनी २५ जुलै २०२६ रोजी तहसीलदारांकडे सादर केला. त्यातही पंच म्हणून प्रणव जगदाळे उपस्थित होता.

११) मौजे घोरपडी पेठ ६७४ येथील मिळकतीमध्ये बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन झाल्याची तक्रार. मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांचा १५ मे २०२६ रोजीचा अहवाल तहसीलदारांकडे सादर. त्यात पंच म्हणून मंथन शिंदे व इतर यांनी सही केली आहे.

मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांच्या प्रत्येक तपासणी अहवालात प्रणव जगदाळे आणि मंथन शिंदे हे प्रामुख्याने उपस्थित असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीतून दिसून आले आहे. हे दोघे पुष्पा गोसावी यांच्या खूप जवळचे असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून मिळाली आहे. मग यांचे पालनपोषण कोण करतोय? हे दोन्ही मोठे कार्यकर्ते आहेत का? स्वतःच्या खिशातून खर्च करून कामे करतायत का?

तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मंथन शिंदे हा पुष्पा गोसावी यांचे सर्व काम पाहणारा आहे – पंचनामे तयार करणे, अहवाल तयार करणे, मॅडमला निरोप देणे-घेणे, सेटलमेंट झाली तर माल मॅडमपर्यंत पोहोचवणे, मॅडमला पंचनाम्यासाठी घटनास्थळी ने-आण करणे, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी आणि कोर्टात ने-आण करणे, उत्पन्न दाखल्यासाठी आलेल्या नागरिकांकडून प्रोटोकॉलसाठी पैसे उकळणे… अशा अनेक प्रकरणांत तो सामील असल्याचे सूत्रांकडील माहिती आहे. क्रमशः 

मागील बातमी वाचा }}} पुण्यातील महसूल विभागात हायटेक भ्रष्टाचाराची किड खालपासून वरपर्यंत सर्व आलबेल? गौण खनिज उत्खनन विभाग म्हणजे सोन्याची खाण? वाचा सविस्तर

पंचनाम्याचा खेळ बाकी सगळं आलबेल?

पंचनाम्यासाठी मंडल अधिकारी स्वतःचे कॅन्डिडेट नेतात. तपासणीनंतर जर जास्त गौण खनिज उत्खनन झाल्याचे दिसले तर त्या साइटवरील लोकांना हे पंच सांगतात की, “आता दंडात्मक कारवाई होईल, मोठे दंड भरावे लागतील, जमिनीवर बोजा चढेल.” संबंधित व्यक्ती घाबरला तर सेटलमेंट होते. मग तहसीलदारांकडे अहवाल सादर करताना एकदम ‘ओके’ असल्याचा अहवाल सादर केला जातो. किंवा संबंधित व्यावसायिक घाबरला नाही तर ३०-४० ब्रास जास्त उत्खनन असल्याचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला जातो. पण तहसीलदार स्वतः कधी पाहणी करतात का? करत असतील तर त्यांची भूमिका काय असते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

तहसीलदारांचे दुर्लक्ष की दुसरे काय?

मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांच्या मागील सात महिन्यांच्या अहवालावर लक्ष गेल्याने हा पंचनाम्यांचा खेळ समोर आला आहे. असे कितीतरी अहवाल असतील ज्यात मंथन शिंदे व प्रणव जगदाळे सामील असतील. पण तहसीलदार अस्मिता माने यांना ही बाब कशी लक्षात आली नाही? नियम सांगणारे तहसीलदार याकडे दुर्लक्ष करत असतील तर ते पुष्पा गोसावी यांना पाठबळ देण्यासारखेच नाही का?
(पुढील बातमीत आणखी धक्कादायक माहिती समोर येणार आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here