लोकल, मेट्रो, आणखीन दोन अश्या चार हॉटेलांवर कारवाई.
पुणे सिटी टाईम्स (PCT) पुणे शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून सर्व सामान्य जिवन अस्वस्थ झाले आहे. परंतु हॉटेल,पब धारकांकडून
कोरोना नियमावलीची ऐशी की तैशी केली जात असल्याच्या बातम्या पुणे सिटी टाईम्स गेल्या आठवड्यापासून प्रसिद्ध करत आहेत.
पुणे शहरातील हॉटेल लोकल, हॉटेल मेट्रो पब मध्ये विना मास्क आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविला जात असताना मुंढवा पोलीसांनी अचानक कारवाई केल्याने पुणे शहरात पब चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.