पुण्यातील राष्ट्रवादीच्या जुबेर बाबु शेख यांना खंडणी मागणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जुबेर बाबु शेख यांना खंडणी मागणाऱ्यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

या प्रकरणी जुबेर बाबु शेख यांनी फिर्यादीवरून दीपक विजय निंबाळकर वय २९, रा. निंबाळकरवस्ती,पिसोळी, ता. हवेली गणेश जगताप वय २८, रा. महम्मदवाडी, हडपसर आणि अमर अबनावे वय२९ रा. उरळी देवाची‌ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जुबेर शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस (NCP Pune) आहेत. त्यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत. त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर राडारोडा टाकला होता.

तो राडारोडा उचलण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मित्र सचिन ननावरे यांना फोन करुन उचलण्यास सांगितले. त्यासाठी दीपक निंबाळकर व त्याच्या साथिदारांनी ५ लाखांची मागणी केली होती. शेख यांना पैसे घेऊन कात्रज रोडवरील कान्हा हॉटेल येथे बोलावले. शेख यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली.

सोमवारी दुपारी शेख हे ४ लाख रुपये घेऊन कान्हा हॉटेल येथे गेले.
शेख यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी तिघांना सापळा रचून पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास
करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे श्रीकांत चव्हाण,गुरव, प्रदीप शितोळे,शैलेश सुर्वे, विनोद साळुखे, संग्राम शिनगारे,सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, प्रविण पडवळ,प्रदीप गाडे, चेतन शिरवळकर, रुपाली कर्णावर यांच्या पथकानं आरोपींना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here